Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Goa today's 08 May 2024 Live News: राजकारण, गुन्हे, क्रीडा, पर्यटन, लोकसभा निवडणूक यासह राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा.
India Alliance Goa
India Alliance GoaDainik Gomantak

मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

गोव्यात लोकसभेसा मतदानाचा नोंदवलेला उच्चांक हा भाजपच्या विरोधात. आम्ही सर्व गोवेकरांचे आभार मानतो. इंडी आघाडी भविष्यातही कायम राहील. इंडी आघाडीच्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचे प्रतिपादन.

India Alliance Goa
India Alliance GoaDainik Gomantak

भूतान आणि मंगोलियातील आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी ओल्ड गोवा चर्चला भेट

रात्री १० वाजल्यानंतर लाऊड स्पीकर लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

रात्री १० वाजल्यानंतर लाऊड स्पीकर लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

केंद्रीय ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार सध्या रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक लावण्यावर बंदी आहे.

गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Goa Rain Update

गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

CM Pramod Sawant

उत्तर गोव्यातील २० ही मतदार संघात भाजपला आघाडी मिळणार. दक्षिण गोव्यातील ६ मतदारसंघांत पक्ष काही प्रमाणात मागे आहे. सावर्डे मतदारसंघातून जास्त मते मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर गोव्यात एक लाखाच्या आघाडीने तर दक्षिण गोव्यात ५०-६० हजार मतांच्या आघाडीने भाजप लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

ही माझी अखेरची निवडणूक - श्रीपाद नाईक

Shripad Naik

उत्तर गोवा भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी ही त्यांची अखेरची निवडणूक असेल, असे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत पक्षच अंतिम निर्णय घेईल, असे नाईक यांनी म्हटले आहे.

कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी - चर्चिल आलेमाव

कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी. सध्या लग्नाला फक्त 10 पर्यंत परवानगी असून, ती पुरेशी नाही. विवाह वेळेचा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मी मुख्यमंत्र्यांनी विनंती करतो. मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा पंतप्रधान मोदींकडे उपस्थित करुन मुदतवाढ द्यावी, असे चर्चिल आलेमाव म्हणाले

देशातील सर्वात शांततेतील मतदान गोव्यात, पोलिस महासंचालकांनी मानले आभार

Goa Police

राज्यात शांततेत मतदान झाल्याबद्दल गोवा पोलिसांनी सर्व गोमन्तकीयांचे आभार आणि अभिनंदन केले आहे. शांततापूर्ण अशी ओळख असलेल्या राज्यात शांततेत मतदान पार पडले.

राज्यातून कोणत्याच घटनेचा पीसीआर कॉल आला नाही. देव बरे करूं! असे गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंह यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले गोमन्तकीयांचे आभार

Goa Loksabha 2024 Voting

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकसभा मतदानात उत्सफूर्त सहभाग घेतल्याप्रकरणी सर्व गोमन्तकीयांचे आभार मानले. राज्यात ७५.२० टक्के मतदान झाले असून, पेडण्यापासून काणकोणपर्यंत सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com