Electricity Price Hike : नाहक वीजदरवाढ नको! श्रीपाद नाईक

Electricity Price Hike : नशिबात असेल तर मुख्यमंत्रिपदही मिळेल
Electricity Price Hike
Electricity Price HikeDainik Gomantak

Electricity Price Hike :

पणजी, सामान्य जनतेवर वीज दरवाढीचा नाहक भार नको, असे मत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुज आयोजित वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केले. आपल्याला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत नाही का? या प्रश्नावर ते उत्तरले, नशिबात असेल तर मिळेल. समाजासाठी काम करणे महत्त्वाचे.

सौर ऊर्जा पर्यावरणाची हानी थोपवेल असे सांगून ऊर्जामंत्री पदाचा गोव्याला प्राधान्याने फायदा मिळवून देईन, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी वार्तालाप कार्यक्रमात स्पष्ट केले.

गोवा मराठी पत्रकार संघातर्फे सोमवारी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या (गुज) सभागृहात ‘गुज’ च्या सहयोगाने श्रीपाद नाईक यांच्याशी वार्तालाप घडवून आणला होता.यावेळी व्यासपीठावर गोवा मराठी पत्रकार संघाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष जयंत संभाजी, उपाध्यक्ष वामन प्रभू, गुरुदास सावळ, सचिव सुभाष कृ. नाईक व ‘गुज’ चे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून तुम्ही केंद्रीय राज्य मंत्री आहात, सहावेळा खासदार निवडून आला आहात तरीही कॅबिनेट मंत्रिपद तुम्हाला दिले जात नाही, कारण आपण वाट्याला येईल ते मुकाट्याने स्वीकारता या संदर्भातील प्रश्नावर श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, मी कुठे असो, नसो मी पक्षाशी नेहमीच प्रामाणिक राहिलो आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी स्वीकारतो. खरेतर अनेकांना राज्यमंत्रिपदही मिळालेले नाही.

दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला त्याचे खापर धर्मगुरूंवर फोडले जात आहे, याविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, मी तसा विचार करत नाही. आम्हाला देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी सर्वांना घेऊन पुढे जायचे आहे. सर्व धर्मियांनी आपल्याला मते दिली आहेत. त्यामुळे कुणाबद्दल आकस असण्याता प्रश्‍नच नाही.

Electricity Price Hike
Goa Waterfalls And Rivers: धबधब्यांवर जाल, तर लाखाचा दंड अन्‌ अटक; गोवा वन खात्याचा आदेश

म्हणून राज्यमंत्रिपदावरही समाधानी !

समाजात मी मिशन म्हणून काम करत आलो आहे. आमदार होईन ही सुद्धा अपेक्षा धरली नव्हती. त्यामुळे राज्यमंत्रिपद मिळाले तरी, मी समाधानी आहे,असेही श्रीपाद नाईक म्हणाले. भाजप येत्या विधानसभेत सत्तेवर येईल का? यावर ते म्हणाले, आम्हाला काय वाटते यापेक्षा लोकांना काय वाटते ते महत्त्वाचे.‘फॅमिली राज’ बद्दलचे मत विचारले असता ते उत्तरले, ज्याची ताकद आहे ते निवडून येतात. फॅमिली राज पसंत नाही, त्यांनी त्यांना निवडून देऊ नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com