Goa Waterfalls And Rivers: धबधब्यांवर जाल, तर लाखाचा दंड अन्‌ अटक; गोवा वन खात्याचा आदेश

Ban On Visiting Waterfalls And Rivers In Goa: पर्यटनमंत्री म्हणतात, निर्णयापूर्वी चर्चा होती गरजेची
Ban On Waterfalls And Rivers In Goa
Ban On Waterfalls And Rivers In GoaDainik Gomantak

Ban On Visiting Waterfalls And Rivers In Goa

गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाळ्यामध्ये धबधबे आणि पाणवठ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात वनक्षेत्रातील धबधबे तसेच इतर पाणथळ जागी जाण्यास किंवा पोहण्यास वन खात्याने मज्जाव केला आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर आता वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून प्रसंगी अटक होऊ शकते. तसेच एक लाख रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो, अशी माहिती उपवनसंरक्षक आनंद जाधव यांनी दिली.

मुख्य वन्यजीव वॉर्डनने नुकत्याच जारी केलेल्या आदेशामध्ये, पावसाळ्यात संरक्षित वनक्षेत्रातील धबधबे तसेच इतर पाणथळ जागी जाण्यास किंवा पोहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. खरे तर गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून पावसाळ्यात येथील निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलते.

ग्रामीण भागात सर्वत्र जलप्रपात पूर्ण क्षमतेने वाहू लागतात. अशा धबधब्यांचे आकर्षण पर्यटकांसह स्थानिकांनाही निर्माण झाले नाही, तरच नवल. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात पावसाळी पर्यटनाचे हे फॅड भलतेच फोफावले आहे. धबधब्यांवर मनसोक्त न्हाऊन निघण्यासाठी आबालवृद्ध सुटीच्या दिवशी ग्रामीण भागांकडे कूच करतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये धबधब्यांवर झालेल्या दुर्घटनांमुळे यंदा वन खात्याने धबधबे आणि पाणवठ्यांवर जायला किंवा पोहायला बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकही हिरमुसले आहेत.

मॉन्सून नियमितपणे गतिमान झाल्यामुळे नद्या आणि जंगलातील धबधब्यांच्या पाण्याच्या पातळीत तसेच प्रवाहातही अचानक वाढ होत आहे. अनेकदा जलप्रवाहांमध्ये उतरलेले लोक वाहून जाण्याचे प्रकारही घडले आहेत.

तसेच धबधब्यांवर वरून दगडधोंडे पडण्याचाही धोका असतो. या गोष्टी लक्षात घेऊन लोकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने ६ जूनपासून सर्व संरक्षित क्षेत्रांमधील नद्या आणि धबधब्यांमध्ये जाण्यास मज्जाव केला आहे.​

या बंदीची अंमलबजावणी वन विभाग कशी करणार आहे, असे विचारले असता, उपवनसंरक्षक जाधव म्हणाले की, राज्यातील प्रत्येक संरक्षित वनक्षेत्र आणि अभयारण्यातील वनअधिकारी आपापल्या क्षेत्रातील धबधबे आणि पाणथळ जागी लक्ष ठेवतील आणि येणाऱ्या लोकांना धबधब्यांवर जाण्यापासून रोखतील. हा आदेश लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन अंमलात आणण्यात

आला आहे.

गतवर्षी अनेकांनी गमावला जीव

गेल्या पावसाळ्यात सांगे, सत्तरी येथे पाणथळ ठिकाणी पोहायला गेलेल्या १५ ते २० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळीही उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी खाणी, नद्या आणि पाणथळ ठिकाणी आणि संरक्षित वनक्षेत्रातील धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली होती.

यांना कारवाईचे अधिकार

याविषयी माहिती देताना उपवनसंरक्षक आनंद जाधव यांनी सांगितले की, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांना या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या लोकांवर वनसंरक्षण कायद्याखाली एक लाख रुपयांपर्यंत दंड तसेच संरक्षित वनक्षेत्रात बंदी असताना बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्याचेही अधिकार आहेत.

स्थानिकांच्या रोजगाराचाही विचार व्हावा!

याप्रश्‍नी पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, धबधब्यांवर बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत, हे मान्य आहे. मात्र, बंदीचा निर्णय घेताना स्थानिक व पर्यटन खात्याशी चर्चा व्हायला हवी. कारण पावसाळी पर्यटनात सर्वांत महत्त्वाचा ‘रोल’ ठरतो तो धबधब्यांचा. राज्यातील धबधबे हे आता देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळेच यासंबंधी निर्णय घेताना मुख्यमंत्री आणि वन विभागासोबत चर्चा व्हायला हवी होती. तरीही आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गतवर्षी अनेकांनी गमावला जीव

गेल्या पावसाळ्यात सांगे, सत्तरी येथे पाणथळ ठिकाणी पोहायला गेलेल्या १५ ते २० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळीही उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी खाणी, नद्या आणि पाणथळ ठिकाणी आणि संरक्षित वनक्षेत्रातील धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com