Panaji News : हल्याळच्या विकासासाठी प्रयत्न करेन - विश्वजीत राणे

विश्‍वजित राणेंची ग्वाही : भाजपच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा
Vishvajit Rane
Vishvajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

रामनगर /पणजी : कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीतून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाईल, यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, अशी ग्वाही गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज हल्याळ जोयडा येथील मतदारांना दिली. हल्याळ, जोयडा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुनील हेगडे यांच्या प्रचारासाठी त्यांनी आज रामनगर परिसरात ठिकठिकाणी जाहीर सभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री राणे म्हणाले, रामनगर येथील जनता अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. आरोग्याच्या पायाभूत सुविधा असो की, कनेक्टिव्हिटी, मोदी सरकारने ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्याला प्राधान्य दिले आहे.

Vishvajit Rane
Panajim Fire News : चिंचोळे येथील आगीत तब्बल 20 लाखांचे नुकसान

सुनील हेगडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली उद्याचा काळ चांगला घडवण्याची वेळ आली आहे. यावेळी सुनील हेगडे यांचेही भाषण झाले. मंत्री राणे यांच्याकडे या परिसरातील सिरशी , कुमठा ,कारवार ,येल्लापूर , भटकळ या मतदारसंघाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असून हल्याळ जोयडा या मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे.

Vishvajit Rane
Panjim Municipal Council: समिती सक्रिय होताच मार्केटची झाली स्वच्छता

परिवर्तनाची हिच वेळ !

परिवर्तनाची हीच वेळ आहे. सुनील हेगडेंना साथ देऊन खऱ्या अर्थाने विकास घडवून आणूया. सर्वांचा विकास हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसरला. आणि त्याच पद्धतीने ते कार्यरत आहेत. हेगडे हे एक गतिमान नेते आहेत, ज्यांनी आपल्या लोकांसाठी अथकपणे काम केले आहे, पक्षाच्या सिद्धांताची अंमलबजावणी केली आहे,असेही राणे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com