व्यक्तिमत्व विकासासाठी 'चैतन्यातून नेतृत्व' कार्यशाळेचे आयोजन

श्रीनिवास मुलुगू : श्री अरबिंदो सोसायटीतर्फे आज, उद्या ‘चैतन्यातून नेतृत्व’ कार्यशाळा
Conducted Personality Development Conscious Leadership Workshop
Conducted Personality Development Conscious Leadership WorkshopDainik Gomantak

पणजी : आपल्यात जर नेतृत्वगुण वाढवायचे असतील, योग्य निर्णय क्षमता घडवायची असेल,तर ती वर-वरच्या प्रयत्नातून येणार नाही, आंतरिक चैतन्यातून निर्माण व्हायला हवी, असे प्रतिपादन अरबिंदो सोसायटीचे श्रीनिवास मुलुगू यांनी केले. ते अरबिंदो सोसायटीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अनिल खंवटे, सचिव दीपक डिसोजा व मनिषा डोलिया उपस्थित होत्या.

तर आपल्याला अरबिंदो सोसायटीद्वारे १४ व १५ एप्रिल दोन दिवसीय चैतन्यातून नेतृत्व या कार्यशाळेचे आयोजन केले असून या कार्यशाळेत श्रीनिवास मुलगु व मनिषा डोलिया मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डोलिया म्हणाल्या, स्वतःची नैसर्गिक नेतृत्वशैली समजून घेणे आणि काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन, नेतृत्वात धैर्याचे महत्त्व, नेतृत्वाची स्वतःची क्षमता समजून घेणे, शांतता आणि समता विकसित करण्यासाठी ध्यानाद्वारे ताण व्यवस्थापन, आदीं बाबींवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.

Conducted Personality Development Conscious Leadership Workshop
Panajim Fire News : चिंचोळे येथील आगीत तब्बल 20 लाखांचे नुकसान

श्रीनिवास मुलुगु हे दूरसंचार व्यावसायिक आहेत. त्यांनी या क्षेत्रातील विविध नामांकीत कंपन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या विषयातील त्यांची दोन पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत.डोमेनमधील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अनेक सत्रांचे अध्यक्षपद भूषवले आहे. आशिया, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया अनेक चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

Conducted Personality Development Conscious Leadership Workshop
Panajim: पणजी जिमखाना परिसरात उभारणार भाऊसाहेबांचा पुतळा

मनिषा डोलिया या श्री अरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन व्यवस्थापन उपक्रमांशी संबंधित आहेत. अनेक वर्षांपासून त्या ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजक आहेत. देशभरातील विविध संस्थांसाठी अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.

अरबिंदो सोसायटीचे विविध क्षेत्रात कार्य

श्री अरबिंदो सोसायटी लोकांना समाजात राहून साधना करण्यास प्राधान्य देते. अध्यात्मिक क्षेत्रासहित शैक्षणिक, आरोग्य, ग्रामविकास तसेच इतर विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. आध्यामिक संस्था असूनही विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारचे कार्य संस्थेकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com