Panaji News : पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार : मुख्यमंत्री

Panaji News : विनामान्यता शिक्षण संस्थांवर कारवाई अटळ
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Panaji News :

पणजी, राज्य सरकार यंदाच्या शैक्षणिक वर्षात पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज स्वयंपूर्ण मित्रांशी संवाद साधताना केली.

राज्यात कोणतीही मान्यता नसताना शिक्षण देऊन तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. बांबू व काजू लागवडीवर यंदा सरकारचा भर असेल, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे तीन महिन्यांच्या खंडानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील स्वयंपूर्ण मित्रांशी संवाद साधला. या कार्यक्रमात विभागीय कृषी अधिकारी आणि भाग शिक्षणाधिकारीही सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गाव पातळीवर युवक-युवतींचे कार्यक्रम आयोजित केले जावेत. त्यांना दृक-श्राव्य माध्यमांच्या साहाय्याने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. गरजवंतांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोचला पाहिजे.

CM Pramod Sawant
Goa Fraud Case: 1 हजार कोटींची फसवणूक! गोव्यातील चौगुले कंपनीच्या सल्लागारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंत्योदय म्हणजे व्यक्तीचा विकास, सर्वांचा विकास झाला की होणार सर्वोदय आणि गावातील सर्वांचा विकास झाला की ग्रामोदय होईल. या तीन तत्त्वांच्या आधारे काम करायचे आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत ३४ हजार जणांची नोंदणी केली आहे. अजूनही त्यात कोणाला नोंदणी करायची असल्यास स्वयंपूर्ण मित्रांनी त्यांना मदत करावी. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी प्रास्ताविक केले.

स्वयंसेवी गटांना २५ रोजी प्रशिक्षण

राज्यभरातील ५०० स्वयंसेवी गटातील महिलांना उत्पादनांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डींग व मार्केटिंग कसे करावे याचे प्रशिक्षण २५ जून रोजी साखळीच्या रवींद्र भवनात दिले जाईल. माध्यान्ह आहाराचा दर्जा पंच व सरपंचांनीही तपासावा. पंचायतींनीही कार्यक्रमांत जिल्हा पंचायत सदस्यांनाही निमंत्रित करावे. विकासासाठी सारे एक, असे चित्र असावे. सर्वांना आर्थिक व सामाजिकदृष्‍ट्या सक्षम बनवावे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

CM Pramod Sawant
Goa Fishermen : मच्छीमारांसाठी नवा कायदा आणा : ओलेन्सिओ सिमॉईस

बांबू, काजूची रोपे उपलब्ध :

बांबू आणि काजू लागवडीसाठी रोपवाटिकांत रोपे उपलब्ध केली आहे. बांबू वाढविल्यानंतर त्यांची खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय बांबू मंडळाशी बोलणी सुरू आहे. काजू ही गोव्याची ओळख असल्याने मागणी एवढा पुरवठा करण्याची राज्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. मग बाहेरचे काजू येथे येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com