Goa Fishermen : मच्छीमारांसाठी नवा कायदा आणा : ओलेन्सिओ सिमॉईस

Goa Fishermen : माशांचे प्रमाण घटले, आंतरराष्ट्रीय नियोजन समितीच्या बैठकीत चिंता
Goa Fishermen
Goa FishermenDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fishermen :

वास्को, समुद्रातील माशांचे प्रमाण घटले आहे. माशांचा साठा वाढवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे. तसेच मच्छीमार लोकांच्या संरक्षणासाठी नवीन कायदा आणावा, अशी मागणी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (एनएफएफ)चे जनरल सेक्रेटरी तथा भारतीय न्यालेनी स्टिअरिंग समितीचे सदस्य ओलेन्सिओ सिमॉईस यांनी केली.

श्रीलंका येथे आशिया पॅसिफिक प्रदेशात अन्न सार्वभौमत्वसाठी आंतरराष्ट्रीय नियोजन समितीने आयोजित केलेल्या नैलेनी ग्लोबल फोरमच्या बैठकीस ओलेन्सियो सिमॉईस उपस्थित होते. श्रीलंकेतील नेगोंबो येथे झालेल्या या बैठकीला १२ देशांचा सहभाग होता. श्रीलंकेच्या मच्छीमारांशी झालेल्या संवादावेळी एलईडी लाइट फिशिंगमुळे मासेमारी नष्ट झाली आहे, ही गोष्ट समोर आली.

Goa Fishermen
Goa Industries: औद्योगिक वसाहतींना वीज खात्‍याचा ‘शॉक’, महिना 40 तास बत्ती गुल; उद्योजकांनी व्यक्त केली चिंता

मासेमारीसाठी एलईडी दिवे वापरल्याने समुद्रातील माशांचा साठा कमी झाला आहे. मासे मिळत नसल्याने आता मच्छीमार प्लंबर, सुतार आदी व्यवसाय किंवा नोकऱ्यांकडे वळले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

नवीन कायदे आणून आपल्या देशातील आधीच कमी होत चाललेल्या मासेमारी साठ्याचे संरक्षण करण्यासाठी सरकारने तातडीने काम करण्याची गरज आहे, जेणेकरून येत्या काही वर्षांत मच्छीमारांचे जीवनमान सुरक्षित होईल, असेही सिमॉईस यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले.

Goa Fishermen
Goa Industries: औद्योगिक वसाहतींना वीज खात्‍याचा ‘शॉक’, महिना 40 तास बत्ती गुल; उद्योजकांनी व्यक्त केली चिंता

एलईडी फिशिंगवर तत्काळ बंदी घाला

वर्ल्ड फोरम ऑफ फिशरीज पीपल्सचे सरचिटणीस श्रीलंकेतील हरमन कुमारा यांनी देखील भारत सरकार आणि गोवा सरकारला समुद्रात एलईडी लाइट फिशिंगवर तत्काळ बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

हवाईयन प्रणालीचे पालन करा

हवाई येथील मच्छीमार महिला नेत्या अन्नामेरी कोन यांनी सांगितले की, भारत सरकारने मासेमारी साठा व्यवस्थापित करण्यासाठी हवाईयन प्रणालीचे पालन केले पाहिजे. हवाई येथील मच्छीमार समुदाय मासेमारी करत नाही, त्यामुळे मांशाचा साठा वाढण्यास मदत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com