Panaji News : पक्षांतरविरोधी कायदा कठोर करू : पवन खेरा

Panaji News : काँग्रेस भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्‍यास पक्षांतर बंदी कायदा बळकट केला जाणार आहे. हा कायदा लागू होताच जुलै महिन्यापर्यंत देशातील पंधरा राज्यांमधील भाजप सरकार कोसळेल. ही भीती सतावत असल्‍यानेच भाजपच्‍या पायाखालची वाळू सरकली आहे.

त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे सांगून जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा यांनी आज येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेस भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

भाजपने आमदार आयात करून आणि विरोधकांना कमकुवत करून लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. त्यामुळे आम्ही पक्षांतरविरोधी कायदा मजबूत करणार आहोत. निवडून आलेल्या आमदारांनी पक्ष बदलला तर त्यांना अपात्र ठरवले जाईल. एकदा हे झाले की, पक्षांतरांना प्रोत्साहन देऊन स्थापन झालेल्या राज्यांमध्ये भाजपचे कोणतेही सरकार राहणार नाही.

पक्षांतर केलेला लोकप्रतिनिधी थेट घरीच जाईल, अशी तरतूद या कायद्यात असणार आहे. पक्षांतर करून मतदारांचा विश्‍‍वासघात करणाऱ्या आमदारांवर वचक राहण्यासाठी पक्षांतरविरोधी कायदा अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असे खेरा म्‍हणाले.

‘पराक्रमी’ प्रज्वल रेवन्नासाठी मोदींचा प्रचार

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू तथा हसनचा खासदार प्रज्वल रेवन्ना हा लैंगिक छळात गुंतलेला आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतर तो जर्मनीला पळून गेला. त्याचे २९०० अश्‍‍लील व्हिडिओ आहेत.

हा जगातील सर्वांत मोठा लैंगिक गुन्हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत माहिती असूनही त्यांनी त्याचा प्रचार केला. सत्ता मिळविण्यासाठी भाजप एवढ्या खालच्या पातळीवर गेला आहे, अशी टीका पवन खेरा यांनी केला.

सार्दिन करतात घरात बसूनच प्रचार : पाटकर

  काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविली आहे. खासदार फ्रन्सिस सार्दिन हे तर घरात बसूनच कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा प्रचार करतात, असा उपरोधिक टोला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला.

जनहितविरोधी भाजपला घरी पाठविण्‍यासाठी विरोधकांमध्‍ये एकजूट असणे गरजेचे आहे, असेही ते म्‍हणाले. दरम्‍यान, हळदोणा मतदारसंघातील काँग्रेसमधून भाजपमध्‍ये प्रवेश करणारे कार्यकर्ते हे भाजपचेच असल्याचा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

Panaji
गोवा बॅडमिंटन संघटनेची निवडणूक ठरणार बिनविरोध; बॅडमिंटनपटू अनुष्का कुवेलकरला समितीत स्थान

पर्यावरणाचे संतुलन राखून गोव्याची जैवविविधता जपण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करू. केंद्रात, कर्नाटकात व गोव्यात भाजप सरकार असताना म्हादईचा विषय का सोडविला नाही? काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्‍यावर आम्‍ही त्‍याबाबत संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढू. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्याला ‘कोल हब’ बनविण्याचा प्रयत्न करत आहेत.

- पवन खेरा, काँग्रेसचे मीडिया प्रभारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com