Canacona: चार रस्ता-आगोंद रस्ता देतोय अपघातांना आमंत्रण; वाहनचालक त्रस्त, ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी

Agonda road condition: चार रस्ता ते आगोंद पर्यंतच्या रस्त्यावर ठिक- ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याकाठी वाढलेली झुडपे सुद्धा वाहनचालकांना त्रासदायी ठरत आहेत.
Canacona Road Issue
Canacona Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: चार रस्ता ते आगोंद पर्यंतच्या रस्त्यावर ठिक- ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याकाठी वाढलेली झुडपे सुद्धा वाहनचालकांना त्रासदायी ठरत आहेत. परिणामी रस्त्यावर लहान - मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

काणकोणातील आगोंद समुद्र किनाऱ्याची ख्याती दूरवर पोहोचल्यामुळे येथे भेट देणाऱ्या देश विदेशातील पर्यटक नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहनांनी येत असतात. ग्रामसभेत फक्त ८ च गतिरोधक घालावेत अशी मागणी केली होती, मात्र या रस्त्यावर नाहक किमान १७ गतिरोधक चार महिन्यांपूर्वीच घातले गेले आहेत.

चार रस्ता ते आगोंद पर्यंत २५ मीटरच्या अंतरने ठिकठिकाणी गतिरोधक असल्यामुळे लोकांत नाराजी असून निरुपयोगी गतिरोधक हटविण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी येथील दुचाकीमागे बसलेली एक महिला गतिरोधकाजवळ दुचाकीवरून पडून मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे या धोकादायक गतिरोधकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Canacona Road Issue
Goa Assembly: कोळशाचा विषय पुन्‍हा पेटला, मुख्‍यमंत्री-सिक्‍वेरांच्‍या उत्तरातील तफावतीमुळे विरोधकांचा हंगामा! कामकाज 10 मिनिटं स्‍थगित

बटर फ्लाय बीचच्या आकर्षणामुळे बहुतेक पर्यटक महामार्गानंतर गुळ्ळे ते आगोंद रस्ता धरतात. हा रस्ता वनखात्याच्या अखत्यारीत असून एकदम अरुंद आहे.

Canacona Road Issue
Goa Public University Bill: 'सार्वजनिक विद्यापीठे' स्थापनेचा मार्ग सुकर, ऐतिहासिक बदलांसाठी विधेयक सादर

दुमाणे पुलाचे काम कधी?

दुमाणे येथील धोकादायक वळणाचे रुंदीकरण करतानाच या ओहोळावरील पुलाची पायाभरणी तत्कालीन माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत होऊन कामाचे येथील वेळीप यांच्याहस्ते उद्‍घाटन ५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते, मात्र अजून ते काम प्रत्यक्षात सुरू न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या धोकादायक वळणावर गतिरोधक व पथदीप लागल्यानंतर अपघातावर नियंत्रण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com