लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. गोव्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. गत निवडणुकीवेळी 72.12 टक्के मतदान झाले होते.
त्यापेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करेल, असे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश वर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात 11लाख 73 हजार 28 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेचा कार्यक्रम दुपारी जाहीर झाल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती सादर केली. वर्मा म्हणाले की, गोव्यातील दोन जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
यंदा २.१ टक्क्यांनी मतदारांची संख्या वाढली आहे. त्यात महिला मतदारांची (सहा लाख) संख्या पुरुष मतदारांपेक्षा (५.७ लाख) जास्त आहे. दोन्ही मतदारसंघांचा विचार केला तर दक्षिण गोव्यात मतदारसंख्या ५.९५ लाख आहे, तर उत्तर गोव्यात ५.८ लाख मतदार आहेत.
नंदनवनातही होणार लवकरच निवडणूक
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्यात येईल. भौतिक आणि काही सुरक्षाविषयक अडथळ्यांचा विचार करता एकाचवेळी निवडणूक घेणे शक्य नव्हते, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये निर्वासितांच्या छावण्यांत राहणाऱ्या लोकांसाठीही वेगळी मतदान केंद्रे उभारली आहेत.
मतदान केंद्रांवर नवीन उपक्रम
यंदा ‘ग्रीन हायवे’ हा उपक्रम राष्ट्रीय महामार्गांजवळील निवडक मतदान केंद्रांवर राबविण्यात येणार आहे.
मतदान केल्यानंतर मतदारांमार्फत औषधी किंवा फळझाडाचे रोपटे लावले जाईल.
सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात मतदान अधिकाऱ्यांकडून वृक्षारोपण.
ज्येष्ठ नागरिकांची टक्केवारी जास्त असलेल्या शहरी भागातील ८ निवडक मॉडेल मतदान केंद्रांमध्ये वैद्यकीय शिबिर राबविणार.
राज्यातील निवडणूक कार्यक्रम असा
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ : 12 एप्रिल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख :
19 एप्रिल
अर्जांची छाननी : 20 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 22 एप्रिल
मतदान : 7 मे
मतमोजणी : 4 जून
राज्यात एकूण मतदान केंद्रे १,७२५
२०१९ सालच्या तुलनेत १०३ नव्या केंद्रांची भर.
उत्तरेत ८६३, तर दक्षिणेत ८६२ मतदान केंद्रे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी घरपोच मतदानाची सेवा
८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ११,६४० मतदारांना आणि ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतदान.
राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या ९ हजार ३७२.
मतदान प्रक्रियेसाठी ७ हजार पोलिस, १४ कंपन्या तैनात.
सध्या दोन कंपन्या राज्यात दाखल; उर्वरित १२ कंपन्या लवकरच येणार.
मुख्य निवडणूक कक्षासह १६ नियंत्रण कक्ष.
उत्तरेत ७ आणि दक्षिणेत ८ कक्षांचा समावेश.
३८ भरारी पथकांचा समावेश.
त्यातील २१ उत्तरेत आणि १७ दक्षिणेत पथके.
आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास ईएसएमएस मोबाईल ॲपचा वापर.
२१८ मॉडेल मतदान केंद्रांची निर्मिती.
त्यात हिरव्या रंगाचे केंद्र, महिला कर्मचारी असलेले केंद्र, दिव्यांग आणि तरुणांचे केंद्र असेल.
राज्यात एकूण १२ तृतीयपंथी मतदार. पैकी उत्तरेत ३, तर दक्षिणेत ९ जणांची नोंद.
यामध्ये स्टेट आयकॉनपैकी एक ट्रान्सजेंडर देखील आहे.
आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी आल्यास १०० मिनिटांत त्यांचे निराकरण करणार.
सिटीझन व्हिजील ॲपवर तक्रार नोंदवण्याची सुविधा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.