Pali News : खांडेपारच्या शांतादुर्गेची महती अवर्णनीय; देवस्थानच्या पुस्तकांचे प्रकाशन

Pali News : प्रा. रमेश सप्रे आणि विवेकशास्त्री गोडबोले यांच्या तसेच इतरमान्यवरांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विवेकशास्त्री गोडबोले यांनी देवी शांतादुर्गेचा वरदहस्त भाविकांवर आहे, त्यामुळेच अशाप्रकारचे कार्य घडून येते असे सांगून देवीवर नितांत श्रद्धा ठेवा त्याची प्रचिती तुम्हाला निश्‍चितच मिळेल असे नमूद केले.
Pali
Pali Dainik Gomantak

Pali News :

पाळी, खांडेपार निवासिनी देवी शांतादुर्गेचे महात्म्य हे अवर्णातीत असून देवीवर अपार श्रद्धा ठेवलेल्यांना तिच्या महतीची अनुभुती मिळाली असल्याचे उद्‍गार प्रा. रमेश सप्रे तसेच वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी काढले.

खांडेपार येथील श्री शांतादुर्गा मंदिरात काल ‘खांडेपार निवासिनी रोयणी कळसाची श्री शांतादुर्गा महात्म्य’ आणि ‘खांडेपारनिवासिनी श्री शांतादुर्गा चरित्र’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, प्रा. रमेश सप्रे यांच्यासमवेत शांतादुर्गा देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप खांडेपारकर, प्रकाशक तसेच या पुस्तकाचे नियोजन केलेले संजय घाटे, लेखक ऋषिकेश परांजपे, देवस्थानचे पुजारी प्रकाश घाटे आदींची उपस्थिती होती.

प्रा. रमेश सप्रे आणि विवेकशास्त्री गोडबोले यांच्या तसेच इतरमान्यवरांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विवेकशास्त्री गोडबोले यांनी देवी शांतादुर्गेचा वरदहस्त भाविकांवर आहे, त्यामुळेच अशाप्रकारचे कार्य घडून येते असे सांगून देवीवर नितांत श्रद्धा ठेवा त्याची प्रचिती तुम्हाला निश्‍चितच मिळेल असे नमूद केले.

संजय घाटे यांनी एक स्तुत्य उपक्रम आखून देवीची महती सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.यावेळी संदीप खांडेपारकर, ऋषिकेश परांजपे तसेच प्रकाश घाटे आणि अनंत काजरेकर यांनीही आपले विचार व्यक्त करून पुस्तकावर भाष्य केले. संजय घाटे यांनी स्वागत व प्रास्ताविकात देवस्थानचा इतिहास विषद केला. सूत्रसंचालन प्रा. सुभाष जाण यांनी केले.

Pali
MSP For Goa Mango: आंब्याला आधारभूत किंमत देण्याचा विचार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

मंदिरे ही सुसंस्कारित पिढी घडवण्याचे माध्यम

प्रा. रमेश सप्रे म्हणाले की, मंदिरे ही सुसंस्कारित पिढी घडवण्याचे माध्यम असून अशाप्रकारची पुस्तके प्रत्येक देवालयातून प्रसिद्ध व्हायला हवी, ज्यामुळे देवस्थान आणि देवतांचे महत्त्व भाविकांना सहज सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकते. संजय घाटे यांनी संकल्पित केलेल्या या पुस्तकातून प्रत्यक्ष अनुभवाची पखरण करण्यात आली असून देवावर नितांत श्रद्धा असल्यावर आपल्याला त्याची अनुभुती मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com