MSP For Goa Mango: आंब्याला आधारभूत किंमत देण्याचा विचार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

MSP For Goa Mango: पणजीत ‘आंबा शो २०२४’ चे उद्‍घाटन; ४० जातींचे आंबे प्रदर्शनात
MSP For Goa Mango
MSP For Goa MangoDainik Gomantak

MSP For Goa Mango

राज्यात शेती व्यवसायाला चांगली संधी आहे, मात्र एकात्मिक शेतीकडे लक्ष दिले जात नाही. पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने व तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा.

शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेसाठी सरकारचा पाठिंबा असेल. आंबा उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यास आधारभूत किंमत देण्याबाबत विचार केला जाईल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

पणजीतील कला अकादमीच्या दालनात कृषी संचालनालयातर्फे आयोजित केलेल्या ‘आंबा प्रदर्शन २०२४’ चे त्यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी कृषीमंत्री रवी नाईक, कृषी संचालक नेविल आफोन्सो, आयसीएआर सीसीएआरआयचे संचालक प्रवीण कुमार, कृषी उपसंचालक संदीप फळदेसाई उपस्थित होते.

MSP For Goa Mango
Vasco Crime: खूनाचे गूढ उलगडेना! वास्को पोलिसांसमोर उभे ठाकले मोठे आव्हान

या ‘आंबा शो’ मध्ये सुमारे एक हजार जणांनी विविध जातीचे आंबे तसेच आंब्यापासून बनवण्यात येणारी विविध उत्पादने स्पर्धेत तसेच प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. आजपासून सुरू झालेला हे प्रदर्शन शनिवार, १८ मे पर्यंत लोकांसाठी खुले आहे. यात आंब्याच्या ७५ जाती तसेच ३५० हून अधिक आंब्याचे पदार्थ असून सुमारे हजार शेतकऱ्यांनी यात भाग घेतला आहे.

शेतकऱ्यांना सर्व बाबतीत पाठबळ !

केंद्राकडून अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी ७० टक्के सबसिडी मिळते व त्यासाठी आधारभूत किंमतही राज्य सरकार देईल. भात शेती अवलंबून न राहता चाऱ्यासाठी इतर शेतीकडे वळण्याची गरज आहे.

काजू शेतात हळद लागवड करता येते. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. भात शेतीव्यतिरिक्त इतर शेती केल्यास शेतमाल विकत घेऊन त्याला आधारभूत किंमत तांत्रिक, अर्थसाह्य व मार्केटींगचे पाठबळ देण्याची सरकारची तयारी आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

कृषी खात्यातर्फे दरवर्षी शेतकऱ्यांना विविध प्रकारची व जातीची झाडे मोफत दिली जातात. लोकांनी अधिकाधिक झाडे लावून त्याचे उत्पादन वाढवावे. जागतिक पातळीवर आंबा निर्यात करून गोवा सुजलाम सुफलाम करावा.

- रवी नाईक, कृषीमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com