Paira: धूळ प्रदूषणातून सुटका करा, नुकसान भरपाई द्या; पैरावासीयांची मागणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परिसराची पाहणी

Paira village dust pollution: धूळ प्रदूषणातून आमची सुटका करावी, प्रलंबित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा खाणग्रस्त पैरा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
Paira village dust pollution
Paira village dust pollutionDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: धूळ प्रदूषणातून आमची सुटका करावी, प्रलंबित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा खाणग्रस्त पैरा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

पैरा येथील साळगावकर खाण कंपनीमुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणासंदर्भात पैरा कूळ संघटनेतर्फे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात आली होती. संबंधित तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे बुधवारी पैरा येथील साळगावकर खाणीसह धुळीने माखलेले गावातील रस्ते आणि शेतीची पाहणी करण्यात आली.

Paira village dust pollution
Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

साळगावकर खाण कंपनीचे व्यवस्थापक काळे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी प्रथमेश देसाई यांनी ही पाहणी केली. यावेळी पैरा शेतकरी कूळ संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत नाईक व शेतकरी उपस्थित होते.

Paira village dust pollution
Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

ग्रामस्थांना मन:स्ताप

खाण ब्लॉक-२ अंतर्गत येणारी पैरा येथील साळगावकर (पूर्वाश्रमीची चौगुले) खनिज खाणीमुळे संपूर्ण पैरा गावात धूळ प्रदूषण वाढले आहे. रस्ते धुळीने माखत असून घरातील कपडे, भांडीकुंडी आदी वस्तूंवरही धूळ साचते. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. धूळ साचल्याने शेतीही नापिक बनून पडीक पडली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे, अशी कैफियत लक्ष्मीकांत नाईक यांनी मांडली.

एका बाजूला धूळ प्रदूषणाचे संकट तर दुसऱ्या बाजूला संबंधित खाण कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची खंत सुभाष साळगावकर यांनी व्यक्त केली. धूळ प्रदूषणातून गावची सुटका झाली नाही आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर संघटित होऊन रस्त्यावर उतरणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com