Paira Mayem: पैरात तणावपूर्व वातावरण! स्थानिक संघटित, दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; ग्रामस्थ मागण्यांवर ठाम

Paira Mayem Mining: स्थानिकांच्या मागण्यांसंदर्भात कोणताच तोडगा न निघाल्याने पैरातील साळगावकर खाणीवरील खनिज वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही बंद राहिली.
 Paira Mayem Bicholim mining issue
Paira Mayem Bicholim mining issueDainik Gomatnak
Published on
Updated on

डिचोली: स्थानिकांच्या मागण्यांसंदर्भात कोणताच तोडगा न निघाल्याने पैरातील साळगावकर खाणीवरील खनिज वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही बंद राहिली. खनिज वाहतुकीवरून पैरा गावात निर्माण झालेला वाद (मंगळवारी) सायंकाळपर्यंत निवळला नव्हता. सायंकाळपासून रात्रीपर्यंत गावात तणावपूर्व वातावरण होते. गावातील लोक संघटित झाले होते.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासाठी (मंगळवारी) रात्री पैरा येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. दुसऱ्या बाजूने स्थानिकांचे आंदोलन रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न जारी असून, रात्री प्रशासकीय अधिकारी, कंपनीचे व्यवस्थापक मंडळ आणि स्थानिकांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. मात्र, या बैठकीत नेमका कोणता तोडगा काढला, ते समजू शकले नाही. सोमवारी मध्यरात्रीही बैठक झाली होती.

मात्र, ती बैठक निष्फळ ठरली होती. गावातील ट्रकांसह स्थानिकांना खाणीवर काम द्या, अशी मागणी करीत पैरातील संतप्त लोकांनी सोमवारी साळगावकर कंपनीची खनिज वाहतूक रोखली होती.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत खनिज वाहतुकीविरोधात लढा सुरूच राहणार, असा निर्धार पैरातील ट्रकवाल्यांसह स्थानिकांनी केला आहे. शिरगाव-पैरा खाण ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या साळगावकर कंपनीची (पूर्वाश्रमीची चौगुले) पैरा येथील खाण सुरू झाली आहे.

 Paira Mayem Bicholim mining issue
Paira Mayem Mining: "स्थानिकांना खाणीवर काम द्या"! संतप्त लोकांनी पैरात खनिज वाहतूक रोखली; ट्रकांवरून बाचाबाची Watch Video

मात्र, काम देण्याबाबत काही स्थानिक ट्रकमालकांना कंपनीने डावलले आहे. रोजगाराबाबतही स्थानिकांवर अन्याय होत आहे, अशी स्थानिकांची तक्रार आहे. कंपनीच्या या गावविरोधी धोरणामुळे स्थानिक लोक संघटित झाले आहेत.

संतप्त लोकांनी सोमवारी अचानक रस्त्यावर उतरून पैरा येथील जंक्शनवर साळगावकर कंपनीच्या पाण्याच्या टँकरसह खनिज वाहतूक रोखून धरली.यावेळी शिरगाव ट्रकमालक संघटना आणि स्थानिकांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली.

 Paira Mayem Bicholim mining issue
Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

आम्ही धूळ आणि अन्य प्रदूषण सहन करीत आहोत. मात्र, रोजगाराबाबत आमच्यावर अन्याय होत असेल, तर गावात मायनिंग काय कामाचे, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित करून आमच्यावर अन्याय होत असेल, तर आम्हाला मायनिंग नकोच. असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com