डिचोली: श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी शिरसईतील श्री महालक्ष्मी मंदिर व श्री समर्थ राष्ट्रोळी देवस्थाला भेट दिली. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतरची ही पहिलीच देवस्थानांची भेट होती. यावेळी ब्राह्मीदेवी, गजेश मांद्रेकर, रामा टेमकर, शुभक्षण नाईक व पांडुरंग उत्तुरकर व पीठाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महालक्ष्मी मंदिराच्या समितीतर्फे प्रिती नवनाथ कानोळकर या दांपत्याने आणि श्री समर्थ रास्ट्रोळी देवस्थान समितीतर्फे मिलन एकनाथ नाईक या दांपत्याने स्वामीजींची ओवाळणी करत स्वागत केले.
ऐतिहासिक भेट
स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी श्री समर्थ राष्ट्रोळी देवस्थाला दिलेली भेट ऐतिहासिक ठरली. 1981 साली राष्ट्रसंत सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांनी व ब्रह्मेशानंदाचार्य यांची प्रथम दर्शनभेट शिरसईत श्री समर्थ राष्ट्रोळी देवस्थानी झाली होती. हा सविस्तर वृत्तांत ब्रह्मानंदाचार्य स्वामींच्या ब्रह्मसत्यम् या जीवन चरित्रात लिखित आहे. त्यामुळे पूज्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतरच्या प्रथम देवस्थान भेटीत ही भेट ऐतिहासिक ठरत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.