Court
CourtDainik Gomantak

Canca VP: काणकात अवैध बांधकाम मालकानेच पाडण्यास केली सुरूवात, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती

Canca Village Panchayat: या अवैध बांधकामाच्या विरोधात रहिवासी संयोग नार्वेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Published on

Canca Village Panchayat

काणका येथे बेकायदेशीररित्या बांधलेले दुकानवजा बांधकाम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित बांधकाम करणाऱ्या मालकानेच स्वःतच पाडण्याचे काम हाती घेतले.

या अवैध बांधकामाच्या विरोधात रहिवासी संयोग नार्वेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात राज्याचे मुख्य सचिव, नगरनियोजन खात्याचे उप नगरनियोजक, पंचायत खात्याचे उप संचालक, जलस्त्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता, वेर्ला - काणका ग्रामपंचायत व बांधकामदार सिल्वेस्टर विनोको पिंटो ई ब्रागांझा यांना प्रतिवादी बनवले होते.

उच्च न्यायालयात सुनावणीवेळी सर्वे क्रमांक २१/११ सदर बांधकाम अवैध असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने बांधकाम पाडण्याचे निर्देश बाँधकामदाराला दिले होते.

त्यानुसार गेल्या २७ फेब्रुवारी रोजी सिल्वेस्टर ब्रागांझा यांनी हे बांधकाम सहा आठवड्यांच्या आत स्वःतहून पाडण्याचे व अनुपालन अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यामुळे न्यायमुर्ती वाल्मिकी मिनेझिस व महेश सोनक यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली होती.

दरम्यान, अवैध बांधकाम हे १०३.६ चौ.मी.क्षेत्रफळात आहे. ज्याला नगरनियोजनने २७.२७ चौ.मी.ची मान्यता दिली होती. त्यामुळे अतिरिक्त बांधकाम पाडण्याचे स्वच्छेने वचन देत आहे,असे ब्रागांझा यांनी म्हटले.

Court
Traffic In St. Inez: सांतिनेजमध्ये ‘वाहतूक कोंडी’तूर्त नित्याचीच, रस्ते खोदकामामुळे मार्ग तोकडा

पंधरा दिवसांत नाला सफाई

बांधकाम करताना नाल्यात टाकलेले बांधकाम साहित्य आणि टाकाऊ माती यापूर्वीच काढून हा नाला साफ केला आहे व पंधरा दिवसांत नाल्याची पूर्णपणे सफाई केली जाईल, अशी हमी ब्रागांझा यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या वचनपत्रात दिली होती.

या प्रतिज्ञापत्रानुसार सोमवार दि. १ एप्रिल पासून हे तीन दुकानांचे बेकायदा बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम ब्रागांझा यांनी हाती घेऊन अर्धे अधिक बांधकाम पाडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com