Vedanta Sesa Goa: वेदांता कंपनीच्या खाणीवर बाहेरील कामगारांना रोखले

पूर्वाश्रमीचे कामगार एकवटले
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Vedanta Sesa Goa:डिचोलीतील वेदांता (सेझा) खाणीवर बाहेरील कामगारांना विरोध करत, पूर्वाश्रमीच्या अस्वस्थ कामगारांनी खाणीवर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना रोखून धरले.

या कामगारांनी आज (सोमवारी) सकाळी कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खाणीवर धडक दिली.

खाणीवरील अधिकारी मांद्रेकर यांची भेट घेऊन त्याठिकाणी काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना काम करण्यास प्रतिबंध केला. संबंधित कामगारांनी काम करणे बंद केल्यानंतर संतप्त कामगार माघारी फिरले.

लिलाव प्रक्रियेतून डिचोलीतील खाण ब्लॉक आपल्याकडेच ठेवण्यात वेदांता कंपनी यशस्वी ठरली आहे. अद्याप खाण व्यवसाय रीतसर सुरू झालेला नाही. तरीदेखील कंपनीकडून पूर्वाश्रमीच्या कामगारांना डावलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा दावा करण्यात येत आहे.

Bicholim
Mauvin Godinho : टॅक्सीचालकांना दिले जाणार ग्राहक आदरातिथ्‍याचे धडे : वाहतूकमंत्री गुदिन्‍हो

नियमांचे पालन केल्याचा दावा

एक जबाबदार कंपनी म्‍हणून आम्ही सर्व लागू कायदे आणि नियमांचे पूर्णपणे पालन करतो. सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवण्यात येत आहे.

2012 मध्ये खाणी बंद झाल्‍यानंतरही कंपनीने सर्व कामगारांना कायम ठेवले आणि आजपर्यंत त्यांना योग्य मोबदला देत आहे, अशी बाजू वेदांता सेसा गोवातर्फे मांडण्‍यात आली आहे.

गप्प बसणार नाही!

आम्हाला डावलून बाहेरील कामगारांना आणून खाणीवर काम करण्याचा प्रयत्न झाला, तर कामगार स्वस्थ बसणार नाहीत.

जोपर्यंत स्थानिक कामगारांना कामावर घेत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष कारबोटकर यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com