Vasco: रस्त्यावरच मांडला बाजार, परप्रांतीय विक्रेत्यांचा गोंधळ; वास्कोत होतेय वाहतूक कोंडी; स्थानिक संतप्त

Vasco Traffic: गोव्याबाहेरील काहीजण वाहनांतून प्लास्टिक फर्निचर आणून ते रस्त्याकडेला विक्रीसाठी ठेवतात तसेच ठिकठिकाणी वाहनांनी फिरून वस्तूंची विक्री करतात.
Vasco Market
Vasco NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: परिसरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. गोव्याबाहेरून येणाऱ्या संबंधित विक्रेत्यांमुळे पालिका, पंचायती यांना कोणताही महसूल मिळत नाही.

याप्रकरणी मुरगाव पालिका, आसपासच्या पंचायती गंभीर दखल घेतील काय, हा प्रश्न आहे. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या विक्रेत्यांविरोधात वाहतूक पोलिस, आरटीओ यांनीही कारवाई करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

येथे गोव्याबाहेरून येणारे काही विक्रेते आपल्या वाहनांतून फळे आणून रस्त्याकडेला वाहन उभे करून फळविक्री करतात. ही फळे घेण्यासाठी वाहनचालक गर्दी करीत असल्याने इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो.

तसेच या विक्रेत्यांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा स्थानिक फळविक्रेते करीत आहेत. आम्ही मुरगाव पालिकेला सोपो तसेच इतर कर भरतो. मात्र, वाहनांतून फळे व इतर माल आणणारे संबंधित गोव्याबाहेरील विक्रेते कोणताही कर न भरता येथे बिनदिक्कतपणे व्यवसाय करतात याबद्दल स्थानिक विक्रेत्यांनी आश्र्यर्य व्यक्त केले आहे.

Vasco Market
Vasco Drugs Seized: वास्कोत ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 4 जणांना अटक; 2.80 लाख रुपयांचा ऐवज जप्त

गोव्याबाहेरील काहीजण वाहनांतून प्लास्टिक फर्निचर आणून ते रस्त्याकडेला विक्रीसाठी ठेवतात तसेच ठिकठिकाणी वाहनांनी फिरून वस्तूंची विक्री करतात. संबंधित विक्रेते मुरगाव पालिका तसेच पंचायतींना कोणताही कर देत नाहीत. काहीजण नवीन वस्तू रस्त्याकडेला विक्रीसाठी ठेवून लोकांना आकर्षित करतात. त्यामुळे विचारपूस करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी वाहनचालक गर्दी करतात. जेणेकरून अर्धाअधिक रस्ता वाहनांनी व्यापतो. त्याचा त्रास इतर वाहनचालकांना सहन करावा लागतो.

Vasco Market
Vasco: विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू! वॉटर हिटरचा शॉक बसल्याची शक्यता; मांगोरहिल येथील घटना

गुरुवार, २५ रोजी बायणातील एमपीटी वसाहतीलगतच्या रस्त्याकडेला काही विक्रेत्यांनी वस्तू विकण्यास आरंभ केल्याने ग्राहकांनी तेथे गर्दी केली होती. सोमवार, २९ रोजी दुपारी १२ वा.च्या दरम्यान काही युवकांनी दाबोळी विमानतळासमोरच्या महामार्गकडेला बूट विक्री सुरू केली होती. त्यामुळे तेथे खरेदीसाठी दुचाकीचालकांनी गर्दी केली होती. यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com