Vasco: विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू! वॉटर हिटरचा शॉक बसल्याची शक्यता; मांगोरहिल येथील घटना

Vasco electric shock death: मांगोरहिल-वास्को येथील मालती देसाली (४३) या महिलेला विजेचा धक्का बसून शुक्रवारी (ता.१९) रात्री मृत्यू झाला.
Vasco electric shock death
Vasco electric shock deathDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मांगोरहिल-वास्को येथील मालती देसाली (४३) या महिलेला विजेचा धक्का बसून शुक्रवारी (ता.१९) रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालती देसाली यांना मृतावस्थेत चिखली उपजिल्हा इस्पितळात आणले होते. याप्रकरणी वास्को पोलिसांना माहिती मिळल्यावर त्यांनी इस्पितळात जाऊन, तेथे उपस्थित असलेल्या मालतीच्या पतीकडे चौकशी केली.

त्यावेळी मालती घरात एकटीच होती. आपण शुक्रवारी रात्री ८ वा.च्या दरम्यान कामावरून घरी परतलो, तेव्हा मालती बाथरूमनजीक उताणी पडलेली आढळली. तिच्या हातात वॉटर हिटर होता. मात्र, तो इलेक्ट्रिक सॉकेटला जोडलला नव्हता. तिची अवस्था पाहून तिला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात आणले, अशी माहिती पतीने पोलिसांना दिली.

Vasco electric shock death
Zubeen Garg Death: मनोरंजन विश्वात खळबळ, प्रसिध्द गायकाचं उपचारादरम्यान मूत्यू; स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता अपघात

पोलिसांनी पंचनामा केल्यावर मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविला. तेथे शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालात विजेच्या धक्क्यामुळे मालती देसालीला मृत्यू आल्याचे स्पष्ट केले.

Vasco electric shock death
Delivery Death Case: प्रसूतीदरम्यान 41 वर्षीय महिलेचा मृत्यू, निष्काळजीपणाचा ठपका; डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल

कफ सिरप प्याल्याने फातोर्डा येथे एकाचा मृत्यू

कफ सिरप पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केलेल्या चंद्रवाडा-फातोर्डा येथील बादशाह ऊर्फ गुडू खान (६७) यांचा मृत्यू झाला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून फातोर्डा पोलिसांनी ही घटना नोंदवून घेतली आहे. उपनिरीक्षक रामराय नाईक पुढील तपास करीत आहेत. बादशाह याला १७ सप्टेंबर रोजी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com