Boma-Khorlim National Highway:
Boma-Khorlim National Highway:Dainik Gomantak

सटी देवीचे मंदिर वाचविण्यासाठी आमचा महामार्गाला विरोध; भोम-खोर्ली महामार्गाविषयी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

भोम-खोर्ली येथून जाणाऱ्या महामार्गाविषयी राज्य सरकार नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप
Published on

Boma-Khorlim National Highway: भोम-खोर्ली येथून जाणाऱ्या महामार्गाविषयी राज्य सरकार नागरिकांची फसवणूक करीत आहे. महामार्गासाठी एकाच बाजूने मोजणी करून सरकार काय सिद्ध करीत आहे. आम्ही सटी देवीचे आणि महादेवाचे मंदिर वाचविण्यासाठी महामार्गाला विरोध करीत आहोत, अशी माहिती भोमच्या ग्रामस्थांनी दिली.

Boma-Khorlim National Highway:
Subhash Shirodkar: 'डिचोलीतील जनतेने पाण्याची चिंता करु नये'; जलस्रोत खात्याचे मंत्री म्हणाले, पडोसे प्रकल्प..

आझाद मैदानावर शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेला संजय नाईक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी ज्यांची घरे महामार्गात जाणार आहेत, त्यांना भाड्याच्या खोलीत ठेवण्यात येईल, असे सांगितले आहे. परंतु ज्यांचे पूर्वीपासून घर आहे, त्यांना हटविण्याचे कारण नाही.

याबाबत ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की, एकतर सरकारने एका बाजूनेच मोजणी केली आहे आणि तीही चुकीच्या पद्धतीने केली आहे. येथील लोकांचे सटी देवीचे आणि महादेवाचे मंदिर हे श्रद्धास्थान आहे. ही दोन्ही देवस्थाने राखण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. मागील 30 तारखेला महामार्गाचा डेमो दाखविण्यात आला, परंतु त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांना देण्यात आली नाहीत,असे ग्रामस्थांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com