आगोंद: धर्मापूर ते पोळेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 66चे प्रलंबित काम सुरू करण्यासंदर्भात काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party) यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याना निवेदन सादर केले. तसेच 1 मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास महामार्ग अडविण्याचा इशारा दिला.
या शिष्टमंडळात जनार्दन भंडारी, विजय भगत, प्रशांत नाईक, विकास भगत, वैष्णव पेडणेकर व इतरांचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग 66 बाळ्ळी ते काणकोणपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला असून या रस्त्यावरून वाहने विशेषत: दुचाकी चालवणे खूपच त्रासदायक ठरत आहे. तसेच अपघातही वाढले आहेत. पाऊस सुरू होताच बंद ठेवलेले काम अजूनपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या नागरिकांचे हाल होत आहेत. ही समस्या घेऊन काँग्रेस व गोवा फॉरवर्डचे कार्यकर्त्यानी मुख्य अभियंते दत्तप्रसाद कामत यांना गाठले व वरील निर्वाणीचा इशारा दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.