गोवा मुक्तीदिनाच्या 60 व्या वर्षानिमित्त गोवा सरकारने आरोग्य संचालनालयातर्फे 'सर्वासाठी दृष्टी' या उपक्रमाअंतर्गत आयोजित मोफत नेत्र तपासणी केलेल्यां लोकांचे चष्म्यांचे वितरिण आज रवींद्र भवन बायणा येथे करण्यात आले. मध्यंतरी पालिका निवडणुकीचे कारण पुढे करून चष्म्यांचे वितरण पुढे ढकलण्यात आले होते. (Organizing free eye check-up camp on the occasion of Goa 60th Liberation day)
60 व्या गोवा मुक्तीदिन वर्ष गोवा सरकार साजरे करत असून त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल आखण्यात आली आहे. त्यानिमित्त आरोग्य संचालनालयातर्फे 'सर्वासाठी दृष्टी' या उपक्रमाच्या अंतर्गत मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन राज्यभर केले होते. उडुपी येथील सुपरस्पेशलिटी नेत्र इस्पितळ असलेले 'प्रसाद नेत्रालय' व गोव्यातील कोलोरकॉन एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोफत नेत्रतपासणी, औषधे, चष्मा तसेच शस्त्रक्रिया करण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यांना उडूपी येथील प्रसाद नेत्रालय मध्ये नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रुग्णाला घेऊन जाण्यापासून व तेथील राहण्याची व्यवस्था इस्पितळातर्फे करण्यात आला होता.
दरम्यान मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराला 6 फेब्रुवारी 2021 पासून डिचोली येथून सुरुवात झाली होती. 12 ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. वास्कोतही 29 फेब्रुवारी 2021 रोजी या शिबिराचे रवींद्र भवन बायणा येथे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दोन हजारापेक्षा अधिक रुग्णांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान या शिबिरात हजर राहिलेल्या ज्यांना चष्मा लागला होता, त्यांना चष्मा लागला असल्याचे सांगून स्लिप देण्यात आली व चष्म्यांचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे फोन द्वारे कळविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मध्यंतरी पालिका निवडणुका आल्याने आचारसंहिता लागू झाल्याने चष्मा वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
दरम्यान आज रवींद्र भवन बायणा वास्को येथे चष्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुरगाव नगरपालिका अध्यक्ष दामोदर कासकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच रवींद्र भवन बाणाचे अध्यक्ष जयंत जाधव, आरोग्य विभाग वास्कोच्या प्रमुख रश्मी खांडेपारकर, कलरकाॅन प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पोळजी, कार्यक्रमाचे संयोजक सुरज नाईक, नगरसेवक दिपक नाईक, माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब, नगरसेविका कृणाली पार्सेकर, मंजुषा पिळणकर, नगरसेवक दामोदर कासकर, लिओ राॅ ड्रीगीस आदी उपस्थित होते.
सुरुवातीला कार्यक्रमाचे संयोजक सुरज नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती देताना एकूण 14 ठिकाणी गावपातळीवर सदर शिबिर संपन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगाव तालुक्यातून सर्वाधिक 2074 नागरिकांनी या उठवला.यात 1213 नागरिकांना चष्मा लागले तर 86 जणांना शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला.कोविड महामारी मुळे सद्या या कार्यक्रमाला ब्रेक लागला असल्याचे त्यांनी यावेळी सांगून 100 ठिकाणी गावपातळीवर सदर शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे ते शेवटी म्हणाले. आज एकूण ५० जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.उर्वरीत जणांना फोनवर काॅल करून चष्मा वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.