Goa Pollution Control Board: कुंकळ्ळीतील कंपनी बंद करण्‍याचा आदेश

Goa Pollution Control Board: प्रदूषणाची तक्रार : पाहणीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली कारवाई
Goa GIDC
Goa GIDCDainik Gomantak

Goa Pollution Control Board: कुंकळ्ळीतील ‘इंडोको टेक आईस ॲण्ड कोल्ड स्टोरेज’ कंपनीला काम बंद ठेवण्याचा आदेश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केला आहे.. या कंपनीला वार्षिक ४ हजार टन बर्फाच्या लाद्या आणि ५ हजार टन मासे साठवणुकीचा परवाना आहे. त्याची वैधता १ डिसेंबर २०२८ पर्यंत आहे.

Goa GIDC
Bhandari Community Goa: कोणता झेंडा घेऊ हाती? भंडारी समाज

प्रदूषणाच्या तक्रारीवरून या कंपनीची तपासणी मंडळाच्या पथकाने २५ ऑक्टोबर रोजी केली होती. अज्ञाताने दूरध्वनीवर मंडळाकडे तशी तक्रार केली होती. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत जलप्रदूषण आणि घाणेरडा वास येण्यास या कंपनीतून निचरा केले जाणारे सांडपाणी कारणीभूत असल्याची माहिती तक्रारदाराने दिली होती. त्यानंतर ही तपासणी करण्यात आली होती.

या तपासणीदरम्यान सांडपाणी सोडण्याच्या वाहिनीला पंप बसवून दुसऱ्या वाहिनीद्वारे सांडपाणी थेटपणे कंपनीच्या बाहेर सोडण्याची व्यवस्था केल्याचे आढळून आले होते. ती सांडपाणी वाहिनी झुडूपे आणि अपुऱ्या प्रकाशामुळे दिसून येत नव्हती. पाहणीवेळी पंप सुरु नव्हता तरी सांडपाणी सोडण्याची तयारी होती, असे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Goa GIDC
Noise Pollution In Goa: अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आता प्रदूषणावर नजर!

काय म्हणते मंडळ...

सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प बंद होता आणि तो कधी सुरु असतो त्याची नोंदवही पाहणीवेळी उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे तो प्रकल्प न चालवता सांडपाणी थेट बाहेर सोडण्यात येत असावे, असे मंडळाचे म्हणणे आहे. कंपनीच्या मागील भागात सिंचनाचा कालवा आहे तेथपर्यंत ती वाहिनी घालण्यात आल्याचे पाहणीत दिसून आले आहे.

राज्यात प्रदूषण होऊ नये आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी लागणारी उपाययोजना वेळोवेळी केली जाते. चांगल्या पर्यावरणाचा गोवा सर्वांना अनुभवता यावा साठी पावले टाकण्यात येत आहेत.

- अरुणकुमार मिश्रा, पर्यावरण सचिव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com