Noise Pollution In Goa: किनारी भागात 8 ठिकाणची ध्वनिमापन यंत्रणा मंडळाच्या नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण झाल्याक्षणी त्याची माहिती या नियंत्रण कक्षात मिळणार आहे. त्याशिवाय किनारी भागात आता नव्याने परवानी मागायला येणाऱ्या आस्थापनांत अशी ध्वनी कंपन मापन यंत्रणा बसविणे सक्तीचे केले आहे.
मोरजीसारख्या शांतता क्षेत्रात याची सक्ती आहे. ती यंत्रणाही ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहे. यामुळे नेमके ध्वनिप्रदूषण कोणी केले, हे शोधावे लागणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण रोखण्यावर आमचा भर आहे.
तंत्रज्ञानाचा वापर सार्वत्रिक असा पाहायला मिळणार तर?
सुरवातीला प्रदूषणकारी उद्योगांनी (लाल वर्गात येणाऱ्या) प्रदूषण मापनाची स्वयंचलित प्रणाली बसविणे सक्तीचे केले आहे. बहुतांश जणांनी तशी यंत्रणा बसविली आहे, उर्वरित जणांनी यंत्रणा बसविणे सुरू केले आहे. यामुळे प्रदूषण झाल्यानंतर त्यासाठी कारणीभूत कोण हे ठरवणे सोपे होणार आहे. उद्योगांनी अशी यंत्रणा बसवली आणि ती वापरात आणली नाही, बंद ठेवली तरी त्याची माहिती मंडळाच्या नियंत्रण कक्षाला समजणार आहे. या कक्षात २४ तास पाहणीसाठी कर्मचारी असतील, असे नियोजन आहे.
या तंत्रज्ञानाची माहिती उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी काही उपाययोजना आहे का?
प्रदूषण रोखण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. त्यामुळे नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित होत असतात. त्या प्रणालींचे उत्पादक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून मला भेटायला येतात. त्यांना मी या तंत्रज्ञानांविषयीची माहिती उद्योगांच्या प्रतिनिधींना द्यायला सांगतो. महिन्यातून एकदा तरी अशा माहिती देणाऱ्या परीषदेचे आयोजन मंडळात केले जाते. याशिवाय प्रदूषण रोखणाऱ्या, मोजणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती उद्योग क्षेत्राला मिळावी यासाठी मंडळात कायमस्वरूपी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
खाणी सुरू झाल्यानंतर ध्वनी आणि धूळ प्रदूषणाच्या तक्रारी वाढतात, त्यावर नजर कशी ठेवणार?
खनिज ट्रकांतून आणून धक्क्यांवर बार्जमध्ये चढवले जाते. त्या भागात अशा तक्रारी असतात. त्यामुळे जेटीच्या वापरासाठी मंडळाकडे परवानगी मागायला येणाऱ्या कंपनीला धूळ प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवण्याची सक्ती केली जाणार आहे. तीही मंडळाच्या नियंत्रण कक्षाशी जोडली जाईल. गरज असेल तेथे ट्रक वाहतुकीच्या मार्गावरही धूळ प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसविली जाईल, याआधीच अनेक ठिकाणी अशी यंत्रणा आहे. तीही नियंत्रण कक्षाशी जोडली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.