Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

Margao News : सरपंच शंके यांनीही पंचायतीचा रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध असल्याचे सांगितले. आमदारांनी या विषयावर पाठिंबा दिल्याबद्दल सरपंचांनी त्यांचे आभार मानले.
Margao
MargaoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Margao News :

मडगाव, सुरावलीत रेल्वेमार्ग दुपदरीकरण करण्यास स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गुरुवारी यासंदर्भात एक बैठक घेऊन एकमताने तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी दिली.

यावेळी सुरावली पंचायतीच्या सरपंच सीमा शंके, अन्य पंच तसेच स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेकडून घरमालकांना सर्वेक्षणासाठी पत्रे आली असल्याने ही तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. वेळसांव आणि कासावली येथील रहिवासी रेल्वे दुपदरीकरणास विरोध करत आहेत. तसाच विरोध सुरावलीतूनही करण्यात येणार असल्याचे आमदार व्हिएगस यांनी स्पष्ट केले.

Margao
Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

सरपंच शंके यांनीही पंचायतीचा रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध असल्याचे सांगितले. आमदारांनी या विषयावर पाठिंबा दिल्याबद्दल सरपंचांनी त्यांचे आभार मानले.

‘लोकांची घरे पाडून विकास नको’

लोकांची घरे पाडून आम्हाला विकास नको, तर रेल्वेने पूल उभारून दुपदरी रेल्वेमार्ग तयार करावा अशी मागणी त्यांनी केली. हा सर्व खटाटोप कोळसा वाहतुकीसाठी चालला असल्याचा दावा आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केला. विकासकामांना आमचा विरोध नाही, परंतु लोकांची जमीन बळजबरीने घेऊन हे प्रकार केल्यास आम्ही ते खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com