Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

Goa News : श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक शाळा परिवाराने आयोजित केलेल्या संस्कार वर्ग व उन्हाळी शिबिराच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बाविस्कर बोलत होत्या.
goa
goaDainik Gomantak

Goa News :

कुंकळळी, मुलांच्या सृजनात्मक वाढीसाठी आनंदोत्सव हा योग्य मार्ग आहे. लहान मुलांना आनंदी वातावरणात शिकवायला हवे तरच त्याच्यातील निरागस बालपण सुयोग्य तारुण्यात बदलू शकेल, असे प्रतिपादन योग गुरु व भगवतगीता परिचय शिक्षिका जयश्री बाविस्कर यांनी केले.

श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक शाळा परिवाराने आयोजित केलेल्या संस्कार वर्ग व उन्हाळी शिबिराच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बाविस्कर बोलत होत्या. यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका दिपा देसाई मुख्याध्यापक विजयकुमार देसाई उपस्थित होते. बाविस्कर यांनी यावेळी उपस्थित पालकांना व शिबिरार्थिना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी नव्हे तर ज्ञानार्थी बनणे गरजेचे असते. चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालयात संस्कार वर्गाना जास्त महत्व दिली जाते, ही अभिनंदनाची बाब आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या जयश्री बाविस्कर व सन्माननीय पाहुण्या दीपा देसाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

goa
Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

मुख्याध्यापक विजयकुमार देसाई यांनी शिबिरार्थिना प्रशस्तीपत्र प्रदान केली. कल्पिता लोटलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शर्वरी नाईक यांनी बक्षिस वितरण सोहळ्याचे संचालन केले. रक्षाली नाईक यांनी आभार मानले. यावेळी मुलांनी आपले अनुभव कथन केले.

शिक्षकांनी शिकविल्या विविध कला

या शिबिरात शाळेच्या शिक्षकांनी व इतर कर्मचाऱ्यानी मुलाना विविध कला व खेळ शिकविले. संगीत, नृत्य, झुंबा नाच, चित्रकला, विणकाम, टाकावूतून टिकावू, रंगकाम, रांगोळी, हस्तकला, पारंपारिक खेळ,

स्केटिंग, परिसराची माहिती व खजाना शोध, असे विविध प्रकारच्या कला व खेल मुलांनी या आठ दिवसीय शिबिरातून आत्मसात केले. तेजस नाईक, सुमित नाईक, जयश्री बाविस्कर, रुथस्मा खान यांनी ही मुलाना मार्गदर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com