'गोव्यातील परिस्थिती बिकट', धार्मिक तणावाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट

Governor PS Sridharan Pillai: सरकारने एकतर नवीन जनगणना करावी किंवा 2012 चा डेटा वापरावा - काँग्रेस
Governor PS Sridharan Pillai
Governor PS Sridharan PillaiDainik Gomantak
Published on
Updated on

Governor PS Sridharan Pillai: गोव्यातील धार्मिक तणावाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.03 ऑक्टोबर) राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली.

तसेच, राज्यात अनुसूचित जमाती (एसटी) इतर मागासवर्गीय आणि महिलांना राजकीय आरक्षणाची मागणीही शिष्टमंडळाने यावेळी केली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात काँग्रेस, आम आदमी पार्टी, रिव्होल्युशनरी गोवान्स पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधींचा समावेश होता. तर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी यावेळी दांडी मारली.

राज्यातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार विधानसभी एसटी आरक्षणावरून लोकांना मूर्ख बनवत आहे. असा आरोप आलेमाव यांनी केला. तसेच, बिहारसारखी जात जनगणना गोव्यात देखील करण्याची मागणी विरोधकांनी यावेळी केली.

नवीन जनगणना केल्याशिवाय जागा आरक्षणाचा विचार करता येणार नाही, असे राज्य सरकार म्हणत आहे. सरकारने एकतर नवीन जनगणना करावी किंवा 2012 चा डेटा वापरावा, असे काँग्रेस नेते म्हणाले.

जातीय सलोख्याचा प्रश्न आहे, गोव्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे, असे आलेमाव म्हणाले.

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान काही सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना समोर आल्या. गोव्यात जातीय अशांतात सहन केली जाणार नाही, असेही आलेमाव म्हणाले.

'राज्यपालांनी दोन्ही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे', असे युरी आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com