Goa : मध्यरात्रीपर्यंतच्या ध्वनी मर्यादेवर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

ध्वनिक्षेपक मर्यादेवर सूट : सरकारकडून प्रसिध्दिपत्रक जारी
high court order to strictly stop Noise Pollution in Goa
high court order to strictly stop Noise Pollution in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa : ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला गोवा सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने सांस्कृतिक/धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी रात्रीच्या वेळी लावल्या जाणाऱ्या  ध्वनिक्षेपक मर्यादेवर सूट दिली आहे. त्यानुसार आता मध्यरात्री 12 पर्यंतच संगीत वाजवता येणार आहे. याबाबतचा निर्णय आज गुरुवारी सरकारने प्रसिध्दिपत्रकाद्वारे जाहीर केला.

high court order to strictly stop Noise Pollution in Goa
Goa Assembly: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी

इतर दिवशी रात्री १० पर्यंत तर नवीन वर्षाचा कार्यक्रम, ख्रिसमस इत्यादी सण-उत्सवांच्या १५ दिवसांच्या कालावधीत मध्यरात्री १२ पर्यंतच संगीत वाजवता येणार आहे. तसेच सकाळी ६ पर्यंतची मुदत सरकारने हटवली आहे. इस्टर डे व १ जानेवारी हा दिवस सरकारने यादीतून वगळला आहे. पूर्वीची निर्बंधाची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत होती त्यामध्ये आता सरकारने सूट दिल्याने गोमंतकीयांना मध्यरात्री १२ पर्यंत संगीत वाजवता येणार आहे

काही दिवसांपूर्वी 31 डिसेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक मर्यादेवर सूट मिळण्‍याची शक्यता पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली होती. पर्यावरण संरक्षण कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्‍यारीत येतो. शिवाय उच्च न्यायालय सध्‍या ध्‍वनिप्रदूषणावर लक्ष ठेवून आहे असेही काब्राल म्‍हणाले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने किनारी भागातील खुल्या जागेत रात्री 10 नंतर संगीतावर बंदी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com