'भाजपला मिळणारा पाठिंबा पाहता विरोधक कुठेही दिसत नाहीत'

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, त्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर व विद्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली केलेला गोव्याचा सर्वांगीण विकास मतदारांच्या समोर आहे.
BJP Government
BJP GovernmentDainik gomantak

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घरोघरी प्रचार करताना मदरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे हे स्पष्ट होत आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी आज केले. पणजी येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सावईकर बोलत होते. यावेळी पणजीचे माजी आमदार व पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सावईकर म्हणाले की भाजपने (BJP) आपले जे 34 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. गोविंद गावडे प्रियोळ व निलेश कब्राल कुडचडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाची संघटन शक्ती आणि उमेदवारांचे वैयक्तिक आणि पक्षीय कार्य यामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि या प्रतिसादाच्या जोरावरच पुन्हा एकदा गोव्यात भाजपचेच सत्तेवर येणार आहे. असा आम्हाला विश्वास आहे. असे सांगून भाजपला मिळणारा पाठिंबा पाहता विरोधक कुठेही दिसत नसल्याचे सावईकर म्हणाले.

BJP Government
गोव्यात 79.17% मुलांचे लसीकरण पूर्ण

भाजपाचा लोकांकडून मिळणारा पाठिंबा आणि येणारे सरकार (Government) भाजपचेच असेल हे जाणून विरोधकांनी भाजपचे सरकार येऊ नये यासाठी महा गठबंधन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही .आणि त्यामुळे भाजपाच्या विरोधात काहीतरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याचे एडवोकेट सावईकर म्हणाले. केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने गेल्या सात वर्षात केलेला देशाचा भरीव विकास, मोठमोठे विकास प्रकल्प, अनेक योजना आणि गोव्यातील (goa) भाजपा सरकारने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, त्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर व विद्यमान मुख्यमंत्री (CM) डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली केलेला गोव्याचा सर्वांगीण विकास मतदारांच्या समोर आहे.

या विकासाच्या बळावरच गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समृद्धीसाठी तसेच प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक विकासासाठी भाजपाचे सरकार गोव्यात हवे आहे. याची जाणीव मतदारांना आहे. आणि त्यामुळेच ते भाजपला मत देतील. यात दुमत नसल्याचे सावईकर म्हणाले. भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर गोव्याच्या प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास करताना समृद्ध गोवा घडवण्याचे प्रयत्न सरकार करेल. असा विश्वास आम्ही मतदारांना देत असल्याचेही सावईकर म्हणाले.

14 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्या दिवशी गोव्यातील मतदारानी कोरोना नियमाचे पालन करून मोठ्या प्रमाणात मतदान करावे आणि भाजपला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यास मदत करावी. असे आवाहनही याप्रसंगी सावईकर यांनी केले.

BJP Government
'विरोधकांच्या अफवांना बळी न पडता सरकारला आणि भाजपला पाठींबा द्या'

लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपाचे जेष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे ते भाजपा सोबतच राहतील. त्यांच्याशी चर्चाही सुरू आहे. तसेच उत्पल पर्रीकर हेही भाजपाचेच आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपा सोडू नये. पक्षाचे काम करत राहवे .अशी आम्ही त्यांना पुन्हा एकदा सूचना करत असल्याचे लक्ष्मीकांत पार्सेकर व उत्पल पर्रीकर यांच्या विषयी पत्रकारांनी विचारले असता एडवोकेट सावईकर यांनी सांगितले. भाजप हा एक मोठा परिवार आहे. आणि परिवारामध्ये नाराजीही असते . मात्र पक्षासाठी आणि लोकहितासाठी काम करताना सर्वांनी एकत्रितपणे काम करावे . असे पक्षाचे धोरण असल्याचे सावर्ईकर यांनी यावेळी सांगितले.

भाजपाने 34 उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित सहा उमेदवार लवकरच जाहीर केले जातील. उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे सरकार सत्तेवर येणार यात तिळ मात्र शंका नाही. असे प्रतिपादन सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी याप्रसंगी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com