Cortalim Jetty: जेटीच्या विस्तारीकरणाला कडाडून विरोध; कुठ्ठाळी ग्रामसभेत ठराव संमत

Cortalim Jetty Expansion: सरपंच सेनिया परेरा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ही सभा झाली
Cortalim Jetty Expansion: सरपंच सेनिया परेरा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ही सभा झाली
Cortalim Panchayat Gram Sabha Dainik Gomantak
Published on
Updated on

कुठ्ठाळी: येथील ग्रामसभेत जेटीच्या विस्तारीकरणाला कडाडून विरोध करण्यात आला. तसा ठरावही संमत करण्यात आला. सरपंच सेनिया परेरा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ही सभा झाली.

सरपंच परेरा यांनी जेटीबाबत माहिती दिली. मच्छीमार खात्याची जेटीच्या विस्तारणीकरणावर एकूण २९ कोटी रुपये खर्च करण्याची योजना होती, असे परेरा यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी जेटीच्या विस्तारीकरणाला विरोध दर्शवला व तसा ठरावही संमत केला. जेटीची आवश्यक ती दुरुस्ती करून केवळ स्थानिक मच्छीमाऱ्यांनाच ती उपलब्ध करावी, असा ठराव घेण्यात आला.

यावेळी पंच फ्रान्सिस, मायकल, उज्ज्वला नाईक, एदुसियाना रॉड्रिक्स, अँजेला फुर्तादो, मानवेल सिल्वा व सचिव शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी रोमी कोकणी भाषेला राजभाषा दर्जा देण्याचा एकमुखी ठराव ग्रामस्थांनी हात उंचावून संमत केला. तसेच दक्षिण गोव्यामध्ये भरवण्यात येणाऱ्या सनबर्नला विरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पंचायत क्षेत्रातील काही छोट्या दुकानांवर अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून पंचायतीने पुढाकर घेउन या विरोधात अँटी नारकोटिक्स विभागामार्फत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ग्रामसभा व पंचायत मंडळाच्या बैठकीला कोणतेही कारण न देता गैरहजर राहणारे मेल्विन वाझ, ओलींदा लोबो व दिव्या रायकर यांच्यावर आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जॉयल फर्नांडिस यांनी काही पंच घर क्रमांक देण्यासाठी लोकांकडून ४० ते ७० हजार रुपये घेत आहेत, असा आरोप केला.

Cortalim Jetty Expansion: सरपंच सेनिया परेरा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ही सभा झाली
Cortalim Jetty: खासगीकरण आणि तरंगत्या जेटीला प्रखर विरोध; कुठ्ठाळी जाहीर सभेत निर्णय

महिला सुरक्षेसाठी गृहमंत्र्यांना निवेदन

महिला वर्गाची सुरक्षा योग्य प्रकारे व्हावी त्यासाठी पंचायतीने पुढाकार घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना आखावी व यासंबंधी गृहमंत्र्यांना निवेदन सादर करावे, असाही निर्णय घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com