Goa Farming: बांबरमध्ये डोलते पारंपरिक भातशेती

Goa Farming: युवावर्गाचा सहभाग: पाच, सहा दशकांपासून भात लागवड
Goa Farming
Goa FarmingDainik Gomantak

Goa Farming: पूर्वी घरातील प्रत्येक पुरुष, महिला मंडळी सकाळी आपल्या शेती कामात अगदी व्यस्त असायची. स्वत: बैल जोडीने जोत धरून नांगरणी करणे, तण काढणे, भात लावणे, खत, पाणी, भाताची कापणी करणे, मळणी अशी कामे करीत होते. आजच्या यंत्रयुगात बांबर-सत्तरीत काही शेतकरी पाच, सहा दशकापासून पारंपरिक शेती करीत उत्तम भात पीक घेतले जात आहे.

सरकारने नागरी पुरवठा खात्याद्वारे योजनांच्या माध्यमातून अगदी रास्त किमतीत दर महिन्याला तांदूळ देण्याचे सुरू केल्यापासून सत्तरी तालुक्यात काही प्रमाणात भातशेती कमी तरीसुद्धा काही ज्येष्ठ लोकांनी पारंपरिक भात शेती परंपरा जोपासली आहे.

नगरगाव पंचायत क्षेत्रातील बांबर गावात आजही पारंपरिक भात शेती कामे केली जात आहेत. त्यात आता वडिलोपार्जित जोताला युवकांचीही मौलिक साथ मिळते आहे. हे विशेष म्हणावे लागेल. बांबर गावात गोविंद ऊर्फ उदय बर्वे, विष्णू जोशी, राम ओझरेकर, गोकुळदास हरवळकर असे काही शेतकरी वर्गाने गेल्या पाच सहा दशकापासून करीत असलेली भात शेती परंपरा जोपासली आहे.

Goa Farming
Goa Farming: मयेत शेतीसाठी तिळारीचे पाणी

गोविंद ऊर्फ उदय बर्वे म्हणाले, आपण गेली ३५ वर्षे भात शेती काम करीत आहे. १ एकर जागेत जानेवारी महिन्यात जया जातीच्या भाताची लागवड करतो. त्यासाठी मुलगा उध्दव बर्वे याची मौलिक साथ मिळते. यांत्रिकीकरणाव्दारे मशागतीची कामे करण्यात आली. त्यासाठी भाड्याने पावर ट्रिलर आणला होता.

पावर ट्रिलर खरेदी करणे परवडणारे नाही. त्यासाठी गरजूंना सरकार मार्फत आवश्यक यंत्रे मिळणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या तरुण वयात आयारेट जातीचे भात लागवड करीत होतो. काही ठिकाणी ज्योती, विक्रम जातीच्या भाताची लागवड केली जाते.

वजन व गोडीच्या बाबतीत ज्योती, जया चांगली असते. १९७६ च्या काळात कुटुंबाची रोजची गुजराण होत नव्हती. त्यासाठा भात शेतीतून वर्षाचे उत्पन्न घेतले जायचे. भात हेच आधार होता. आताच्या घडीला कामगार मिळत नाही. कुडशे गावातून कामगार बोलावून काम केले आहे. चार माणसे जमली तरच काम होऊन जाते. लागवडीसाठी २२ दिवस काम केले आहे, असे बर्वे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com