Operation Flushout: ऑपरेशन फ्लशआऊट! गोव्यातील हरमल येथून रशियन नागरिकाला अटक

Goa Police Operation Flushout: गोव्यात वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करणाऱ्या रशियन नागरिकाला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Immigration violation in Goa
Illegal foreigner stay in Arambol, Goa police foreigner arrestDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोव्यात बेकायदा पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाते. याच कारवाईचा भाग म्हणून उत्तर गोव्यात हरमल येथे वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या रशियन नागरिकाला अटक करण्यात आली. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिस राबवत असलेल्या ऑपरेशन फ्लशआऊट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कारवाई केली. पेडणे तालुक्यात हरमल येथे पोलिसांना चौकशीदरम्यान, एक रशियन नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी इव्हीगेनी शेलोपुखो (४०) असे अटक करण्यात आलेल्या रशियन नागरिकाचे नाव आहे. गिरकर वाडा येथील ख्रिसपेरिओ डिसुझा यांच्या मालमत्तेत त्याचे वास्तव्य होते.

Immigration violation in Goa
Goa Crime: मुंगूल गँगवॉर प्रकरण, वॉल्‍टरचे दक्षिणेतील वर्चस्‍व भेदण्‍यासाठी केपे-फोंड्यातील 4 गँग एकवटल्या

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फॉरेन ऑर्डर १९४८, पासपोर्ट एन्ट्री नियम १९५० आणि पासपोर्ट एन्ट्री कायदा १९२० अंतर्गत ही कारवाई केली. अटक करण्यात आलेला रशियन नागरिक इव्हीगेनी शेलोपुखो हरमल गोवा येथे विना पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिस निरीक्षक हळर्णकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, इव्हीगेनी शेलोपुखो याला न्यायालयीन नियमावलीनुसार अटक करण्यात आली आहे. पणजीतील विभागीय विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाच्या मार्फत रशियन कार्यालयाला याची माहिती देण्यात आल्याचे हळर्णकरांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com