
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने गनिमी कावा करत ही यशस्वीरित्या कारवाई केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशातील 244 जिल्ह्यात बुधवारी (7 मे) मॉक ड्रिलची घोषणा केली होती. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना जारी केल्या होत्या, ज्यासाठी मंगळवारपासूनच तयारी सुरु झाली होती. आता विविध ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांचा समावेश आहे. चला तर मग मॉक ड्रिल कोणत्या ठिकाणी आणि केव्हा आयोजित केली जात आहे ते जाणून घेऊया...
बुधवारी दुपारी 4 वाजता मुंबईत (Mumbai) मॉक ड्रिल आयोजित केली जात आहे. यावेळी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले 60 सायरन वाजवले जातील. त्याचवेळी, दक्षिण मुंबईतील एका मैदानात लोकांना एकत्र केले जाईल आणि त्यांना युद्धसदृश परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे हे सांगितले जाईल. यादरम्यान संपूर्ण मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्यास सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, असे नागरी संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबईच्या उपनगरातील एका छोट्या भागात ब्लॅकआउट लागू करण्याची योजना आखली जात आहे.
मिझोरममध्ये बुधारी दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल आयोजित केली जाईल.
नागालँडमधील संरक्षणप्रवण जिल्ह्यांमध्ये दुपारी 4 वाजल्यापासून मॉक ड्रिलचे आयोजन केले जाईल.
तसेच, बुधवारी संध्याकाळी 7:00 ते 7:10 मिनिटांपर्यंत बिहारमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट असेल. यादरम्यान दिवे बंद केले जातील.
लखनऊमध्ये हवाई हल्ल्याच्या सायरन वाजवून गर्दी नियंत्रणाचा सराव केला जाईल. मॉक ड्रिलसाठी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) 19 ठिकाणे चिन्हांकित करण्यात आली आहेत.
कॅटेगरी (A)
नरोरा (बुलंदशहर) - दुपारी 4 वाजता
कॅटेगरी (B)
कानपूर - सकाळी 9:30 / दुपारी 4
आग्रा - रात्री 8 वाजता
प्रयागराज - संध्याकाळी 6:30
गाझियाबाद - सकाळी 10/ रात्री 8
झाशी - दुपारी 4 वाजता
लखनऊ - संध्याकाळी 7 वाजता
मथुरा - संध्याकाळी 7 वाजता
मेरठ - दुपारी 4 वाजता
सहारनपूर - दुपारी 4 वाजता
गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, बक्षी का तालब परिसरातील मॉक ड्रिलचे वृत्तांकन मीडिया करणार नाही.
चंदौली - संध्याकाळी 7 वाजता
सारसावा - दुपारी 4 वाजता
बरेली - रात्री 8 वाजता
गोरखपूर - संध्याकाळी 6:30
मुरादाबाद - दुपारी 12 वाजता
वाराणसी - वेळ निश्चित नाही.
कॅटेगरी (C)
बागपत - संध्याकाळी 7 वाजता
मुझफ्फरनगर - वेळ निश्चित नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.