Goa Assembly Session: केवळ गोवेकरांनाच शॅक उभारता येणार; पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची विधानसभेत माहिती

सरकार लवकरच आणणार शॅक धोरण
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Assembly Session 2023: राज्यातील किनाऱ्यांवर उभारल्या जाणाऱ्या शॅक बाबत लवकरच सरकार शॅक पॉलिसी आणणार आहे. पारंपरीकरित्या शॅक उभारणाऱ्या गोवेकरांनाच यापुढे शॅक उभारता येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभा अधिवेशनात दिली.

Goa Assembly Session
Goa Assembly Session: रोजगारासंबंधी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

मंत्री खंवटे म्हणाले की, राज्य सरकार लवकरच शॅक पॉलिसी आणणार आहे. त्यासाठी शॅक व्यवसायात सहभागी असलेल्या सर्वांना विश्वासात घेले जाणार आहे. सरकारतर्फे उत्तर गोव्यात एक आणि दक्षिण गोव्यात एक असे मॉडेल शॅक उभारले जाणार आहे. याशिवाय किनारा व्यवस्थापन धोरणही तयार केले जाणार आहे.

गेल्या काही दिवसात शॅक व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने सरकारसह विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली होती. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यासह विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com