मडगावातही ऑनलाईन सेक्स रॅकेट्सचा सुळसुळाट

कोलव्यात मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम वेश्याव्यवसाय
Goa Massage Parlour
Goa Massage Parlour Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या मडगावबरोबरच दक्षिण गोव्यात कोलवा, वास्को व काणकोण येथे मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय बहुतांश ऑनलाइन पद्धतीने केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

गोव्यात येणारे पर्यटक ऑनलाइन वरून दलालांशी संपर्क साधत असून, ते खरोखरच पर्यटक असल्याची खात्री झाल्यावर त्यांना मुली पुरविण्यात येत आहे. हल्लीच्या काळात मडगाव आणि कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा चार प्रकरणांची नोंद झाली आहे.

हा व्यवसाय कसा चालतो याबद्दल माहिती देताना अर्जचे अरुण पांडे म्हणाले, अशी प्रकरणे बहुतांश कोलवा, मडगाव, वास्को आणि काणकोण येथे आढळून आली आहेत. बहुतेक प्रकरणात परराज्यातील युवतींना या भागातील हॉटेलमध्ये आणून ठेवले जात असून, नंतर मागणीप्रमाणे त्यांना ग्राहकांना पुरविले जाते.

क्राईम ब्रँचने हल्लीच मडगावात एका ठिकाणी धाड घालून तिघांना अटक केली होती. तर दोन युवतींची सुटका केली होती. कोलवा येथे मसाज पार्लरच्या नावाखालीही मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू आहे. या पार्लर्समध्ये मणिपूर आणि नेपाळ येथून आणलेल्या युवतींना या व्यवसायात जुंपले आहे, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. या पार्लर्सविरुद्ध पोलिसात तक्रार देऊनही त्याचा फारसा काही फायदा होत नाही, असे स्थानिकांनी सांगितले. काणकोण किनारपट्टीवरही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे. कित्येक पर्यटक केवळ यासाठीच या भागांना भेट देत असल्याचे उघड झाले आहे.

Goa Massage Parlour
मसाज पार्लर बनताहेत पर्यटकांचे आकर्षण

दक्षिण गोव्यात जे पर्यटन क्षेत्र आहे तिथे परराज्यातून मुलीना पळवून आणून वेश्याव्यवसायाला जुंपले जात असते. यावर नियंत्रण आणण्यासाठी मडगावात खास मानव तस्करी विरोधी पथक स्थापन केले असले तरी हे पथक कुचकामीच ठरले आहे. आतापर्यंत या पथकाने एकही प्रकरण नोंद केलेले नाही. जी काही थोडीफार कृती केली आहे ती क्राईम ब्रँच पोलिसांनी, अशी माहिती अर्जचे अरुण पांडे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com