पणजी : राज्यात किनारपट्टी परिसरात मसाज पार्लरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, आता हे प्रमाण शहरामध्ये अधिक वाढले आहे. ते मसाज पार्लर राहिले नसून पर्यटकांना आकर्षण करणारे केंद्रे बनली आहेत. या मसाज पार्लरना अप्रत्यक्षपणे पोलिसांचा आशिर्वाद असल्यानेच अनेक गैर कृत्ये सुरू असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्लरमधील अधिक तर कर्मचारी या परप्रांतीय तरुणी असतात. या पार्लरची वेळोवेळी पोलिसांनी तपासणी करण्याची गरज आहे मात्र त्याकडेही कानाडोळा होत असल्याने या पार्लरवाले मस्तावले आहेत.
प्रत्येक पोलिस स्थानकाच्या भागात किती मसाज पार्लर आहेत याची माहिती त्या स्थानकाकडे असणे आवश्यक आहे ती असते; मात्र नवे मसाज पार्लरची त्यात वाढ झाली असल्यास त्याची नोंद पोलिसांकडे नसते. या मसाज पार्लरमध्ये येणारे ग्राहक हे बहुतेक करून गोव्यात मौजमजा करण्यासाठी येणारे पर्यटक असल्याने तेथे परराज्यातील तरुणींची वर्णी लावली जाते. त्यामध्ये अधिक तरुणी उत्तर भारतातील असतात. त्यांना काही दलाल गोव्यात आणून या पार्लरमध्ये कामे देतात. त्याना एकाच फ्लॅटमध्ये ठेवण्यात येते. मसाज पार्लरमध्ये येणारे पर्यटक हे अधिक तर तरुण मुलेच असतात त्यामुळे त्यांना जे अपेक्षित असते त्यावरच या तरुणी या ग्राहकांना भुरळ पाडतात.
अनेकदा या तरुणींची मजल बरीच पुढे जाते त्यामुळे गोव्यात हे मसाज पार्लर आता वेश्या व्यवसायाचे अड्डे बनले आहेत. अनेकदा कारवाईसाठी धाडस केल्यास राजकारण्यांकडून दबाव येतो अशावेळी पोलिसांना नाईलाजाने काढता पाय घेण्याची पाळी येते असे मत एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.
पणजीतही अलिशान मसाज पार्लर व स्पा आहेत. या स्पा व पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीही अधिक तर परप्रांतीय आहेत. या तरुणी मसाज करण्यासाठी सक्षम आहे का याची कोणीच त्याची तपासणी केली जात नाही. अनेक तरुणी या मसाजचे अधिकृत प्रशिक्षण घेतलेल्या नसतात तर अनुभवाने त्या मसाज पार्लरमध्ये काम करतात. य मसाज पार्लर व स्पा मालकही हे परप्रांतीय असतात व त्यांचे लागेबांधे गोव्यातील उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांशी असल्याने ते सुद्धा पोलिस यंत्रणेला घाबरत नाहीत. त्यामुळे पोलिस अशा मालकांच्या पार्लर व स्पा या ठिकाणी जात नाहीत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.