Cyber Fraud: अज्ञात लिंकवर क्लिक करणं पडलं महागात! फातोर्डा येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक, 10 लाख उकळले

Online KYC Fraud Fatorda: बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगून एका सायबर भामट्याने फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबाची तब्बल १० लाख २० हजार १८५ रुपयांची फसवणूक केली.
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगून एका सायबर भामट्याने फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबाची तब्बल १० लाख २० हजार १८५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यानगर-घोगळ येथील सिद्धाली काकोडकर यांनी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

३० मे रोजी तक्रारदाराच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. आपण बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे भासवत संबंधिताने खात्याचे केवायसी प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘बीओआय आधार अपडेट’ नावाचे एपीके ॲप डाउनलोड करून त्यावर आवश्यक माहिती भरण्यास सांगितले.

Cyber Fraud
Goa power supply: आधी रिचार्ज करा, मगच वीज वापरा! सुदिन ढवळीकरांच्या नव्या फतव्यानं गोमंतकीय संतापले; गोव्यात विरोधी पक्षांनी स्मार्ट मीटरविरोधात उगारले हत्यार

तक्रारदाराने त्यावर विश्वास ठेवून माहिती भरल्यानंतर तिच्या बँक खात्यातून १ लाख ६९ हजार ६८५ रुपये काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली.

Cyber Fraud
Goa Health Services: राज्यात 'आयसीयू' सेवांना बळ, 'आयुर्वेद आरोग्य व्यवस्थापन'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

त्यानंतर संशयिताने त्यापैकी १ लाख ४९ हजार ५०० रुपये परत खात्यात जमा केले.यानंतरही भामट्याने आपला डाव सुरूच ठेवला. २ जून रोजी त्याने तक्रारदाराच्या मोबाईलमधील माहितीच्या आधारे तिच्या वडिलांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा तपशील मिळवून त्या खात्यातून १० लाख २० हजार १८५ रुपये परस्पर काढून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com