Online Fraud: ‘ओटीपी’ शेअर केला अन् कष्टाचे पैसे गमावून बसला!

मडगाव पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
Online Fraud
Online FraudDainik Gomantak

Online Fraud: ‘जी पे’ वरून 1 रुपया ट्रान्सफर केल्याच्या बदल्यात 99 हजार रुपये घालवून बसण्याची नामुष्की ओढवलेल्या आके बायश येथील सुरेंद्र नाईक यांनी ऑनलाईन संपर्क केलेल्या भामट्याला मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ सांगण्याची चूक केली. त्याच चुकीमुळे त्याचे कष्टाने कमवलेले 99 हजार त्या भामट्याच्या खात्यात जमा झाले.

Online Fraud
Goa Congress : काँग्रेसची उद्यापासून ‘हात से हात जोडो’ मोहीम

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक यांचा एक फ्लॅट असून तो ते पर्यटकांना भाड्याने देतात. हाच फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सुरेंद्र शर्मा नामक इसमाने त्यांच्याशी संपर्क साधला. भाड्याची चौकशी करून ‘जी पे’ वरून मला एक रुपया पाठवा, मी तुम्हाला तुमचे पैसे पाठवतो, असे सांगितले.

Online Fraud
एमपीए मैदानप्रश्‍नी याचिकेवर सुनावणीला न्यायालयाची मंजुरी

पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी सांगितले,की नाईक याला मोबाईलवर भामट्याने एक लिंक पाठवून ती उघडायला सांगितली. नंतर तीनदा ओटीपी विचारून घेऊन त्यांच्या खात्यातील 99 हजार स्वतःच्या खात्यात वळते केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com