Goa Congress : काँग्रेसची उद्यापासून ‘हात से हात जोडो’ मोहीम

मांद्रे-तेरेखोल येथून मोहिमेला प्रारंभ होणार
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress : राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंतच्या ''भारत जोडो'' यात्रेला प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेसने आता देशभर ''हात से हात जोडो'' मोहीम सुरू केली आहे. गोव्यातही 4 मार्चपासून पुढील महिनाभर ही मोहीम राबविली जाणार आहे.

मांद्रे-तेरेखोल येथून या मोहिमेला प्रारंभ होणार असून, 5 एप्रिलला मडगावात या मोहिमेचा समारोप होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

Goa Congress
Dudhsagar Falls : दुधसागरला सायकल नाही, जीपनेच जा! ; वन खात्‍याचा आडमुठेपणा

काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत पाटकर यांनी या मोहिमेचा उद्देश आणि वेळापत्रक जाहीर केले. याप्रसंगी उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, सरचिटणीस विजय भिके, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो रॉड्रिग्स उपस्थित होते.

मोहिमेचा भाग म्हणून होणाऱ्या जाहीर सभांची ठिकाणे नंतर जाहीर करू, असेही पाटकर यांनी नमूद केले. विजय भिके यांनी उत्तर गोव्यातील मोहिमेची माहिती दिली.

उत्तर गोव्यात 12 दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. सावियो रॉड्रिग्स यांनी दक्षिण गोव्यातील मोहिमेची माहिती दिली. दक्षिण गोव्यात 23 मार्चपासून मोहीम सुरू होणार आहे.

मोहिमेची रुपरेषा अशी...

4 मार्चला मांद्रे येथील तेरेखोलमधून ‘हात से हात जोडो’ या मोहिमेस प्रारंभ होईल. 5 मार्चला शिवोली, कळंगुट, 11 मार्चला म्हापसा, हळदोणा, 12 रोजी साळगाव, पर्वरी, 13 रोजी पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, 14 रोजी सांत आंद्रे, कुंभारजुवे, 15 रोजी थिवी, डिचोली, 16 रोजी पेडणे, 17 रोजी मये, 18 रोजी साखळी आणि 19 मार्चला पर्ये आणि वाळपई येथे मोहीम राबवण्यात येईल. साखळीत जाहीर सभा घेण्यात येईल.

Goa Congress
Bihar Viral News: चक्क नवऱ्यांची केली अदलाबदल; बिहारमधील अजब प्रेम कहाणीमुळे संपूर्ण देशाला धक्का

मडगावात समारोप

23 रोजी प्रियोळ, मडकई, 24 रोजी फोंडा, 25 रोजी शिरोडा, सावर्डे, 26 रोजी कुडचडे, केपे, 27 रोजी सांगे, 28 रोजी काणकोण, 29 रोजी नावेली, बाणावली, 31 रोजी कुठ्ठाळी, मुरगाव, 1 एप्रिल रोजी वास्को, दाबोळी, 2 एप्रिलला कुंकळ्ळी, वेळ्ळी, 3 रोजी नुवे, कुडतरी व फातोर्डा आणि 5 रोजी मडगावात मोहिमेचा समारोप होईल. तेथे जाहीर सभाही होईल.

"राज्यात बेरोजगारी, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, तरीही सरकार सुस्त आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना जनतेला हवे तेच निर्णय घेतले गेले. जनता म्हादईबाबत चिंतेत आहे, पण भाजप म्हादईचा राजकारणासाठी वापर करत आहे."

- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com