Online Fraud : वेर्ण्यात एका बॅंकेच्या खातेधारकाला 2 लाख 30 हजारांचा ऑनलाईन गंडा

वेर्णा पोलिसांत गुन्हा नोंद
Online Fraud
Online FraudDainik gomantak
Published on
Updated on

Verna Online Fraud : राज्यात ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सुरुच असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन गंडा घातल्याचे असेच एक प्रकरण वेर्णातून समोर आले आहे. यात एका व्यक्तीला 2 लाख 30 हजारांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Online Fraud
SCO Summit Goa 2023: बिलावल भुत्तो गोव्यात, 'पाक'ला भीती 'मिसाईल मिनिस्टर' जयशंकर यांची

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयिताने बॅंकेच्या एका खातेधारकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आहे असे भासवले व मोबाईलवर आलेली लिंक डाऊनलोड करण्यास भाग पाडले. खातेधारकाने लिंकवर क्लिक करताच खातेधारकाच्या खात्यामधून पैसे काढण्यात आले.

खातेधारकाला एकूण 2 लाख 30 हजारांचा गंडा घालण्यात आला. या घटनेची तक्रार संबंधिताने वेर्णा पोलिसांत दाखल केली आहे. वेर्णा पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Online Fraud
Turtle Conservation Campaign: कासव जगवणार, की पर्यटन व्यवसाय?

ऑनलाईन गंडा घातल्याची एक घटना मडगाव येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेत 99 हजारांचा गंडा घालण्यात आला होता. "तुमचा फ्लॅट मला भाड्याने घ्यायचा आहे. पुढचे व्यवहार करण्यासाठीं मी दिलेल्या नंबरवर गुगल पे द्वारा फक्त एक रुपया पाठवा", असे सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com