Turtle Conservation Campaign: कासव जगवणार, की पर्यटन व्यवसाय?

‘सायलेंट झोन’ असूनही ध्वनिप्रदूषण : आश्वे-मांद्रेतील व्यावसायिकांची गोची
Turtle Conservation Campaign
Turtle Conservation CampaignDainik Gomantak
Published on
Updated on

Turtle Conservation Campaign: कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत मोरजी, आश्वे-मांद्रे हे दोन किनारे सायलेंट झोन म्हणून जाहीर केल्यानंतरही त्याची योग्य पद्धतीने कार्यवाही होत नाही. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत कासवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

या कायद्यामुळे कासव जगणार; पण पर्यटन व्यवसाय कोण तारणार? अशी स्थिती सध्या मोरजी, आश्वे-मांद्रे किनारी भागातील व्यावसायिकांची झाली आहे.

सायलेंट झोनची कार्यवाही कडकपणे झाली आणि किनाऱ्यापासून पाचशे मीटरच्या अंतरावर संगीत वाजवण्यास निर्बंध लागू झाले तर भविष्यात पर्यटन व्यवसायाला खीळ बसेल. या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल.

अनेकांनी उसने पैसे घेऊन, बँकेचे कर्ज घेऊन, सोने-दागिने गहाण ठेवून व्यवसाय उभारला आहे, त्यांचा व्यवसाय कसा चालणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Turtle Conservation Campaign
Goa Congress: टँकर व व्यापारी वाहनांकडून सरकारला कोणताही महसूल नाही- अमित पाटकर

सरकारचे दुटप्पी धोरण

2011 च्या अधिसूचनेप्रमाणे गालजीबाग, मोरजी, मांद्रे हे किनारे कासव संवर्धनासाठी राखीव घोषित केले. पण खरोखरच सरकारला कासवांचे संगोपन करायचे असते तर कोणत्याही व्यावसायिकांना परवाने द्यायला नको होते.

परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हा कायदा धाब्यावर बसवला जात आहे, असे मत पर्यटन व्यावसायिक सुदेश सावंत यांनी व्यक्त केले.

प्रदूषणातही कासव संवर्धन मोहीम सुरूच

सध्या येथे एका बाजूला पर्यटन व्यवसाय सुरू असतानाही दुसऱ्या बाजूने कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण सुरू असतानाही कासवांनी मोठ्या प्रमाणात अंडी घातली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अंडी घालण्याच्या प्रमाणात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.

Turtle Conservation Campaign
Mapusa News: ग्रामसभेत गदारोळ! म्हापसा पोलिस अ‍ॅक्शन मोडवर...

...मग रहिवाशांचे काय?

सुदेश सावंत यांनी सांगितले की, सुरुवातीला ही कासवे फक्त मोरजी-तेमवाडा येथे यायची. त्यांच्यासाठी किनारपट्टीचा तो भाग राखीव ठेवला होता. या भागात मच्छीमार रहिवासीही जास्त प्रमाणात आहेत.

पण 2011 साली कासव संवर्धनाखाली पूर्ण किनारपट्टीच आणण्याचा विचार केला. पण हे करताना या भागातील सुमारे 20 हजार लोकसंख्या आणि पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसाय यांचा विचार केला काय? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com