Onion Rate : खूशखबर..! कांदा होणार स्वस्त

भाव दहा रुपयांनी घसरला : ‘फलोत्पादन’ मंडळाचा ५० रुपये दर
Onion
OnionDainik Gomantak
Published on
Updated on

Onion Rate : पणजी ग्राहकांसाठी विशेष करुन गृहिणींसाठी खुशखबर आहे. शंभरीच्या जवळपास पोचलेल्या कांद्याची दरवाढ कमी होण्याचे संकेत मिळाले असून आज बाजारात ७० रुपये दराने कांदा विक्री सुरू होती.

बेळगाव बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचा दर उतरला असून उद्या बुधवारी बेळगाव बाजारात अधिक कांदा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दरात आणखी घसरण शक्य आहे.

राज्यातील बाजारात कांदा १० रूपयांनी स्वस्त झाला आहे. येत्या चार दिवसात राज्यातील बाजारपेठांमध्ये ५० रूपये किलो पर्यंत कांदा येईल तर आठवडाभरात ३० ते ४० रूपयांना कांद्‍याचे दर येणार असल्याचे विक्रेते सांगतात. फलोत्पादन मंडळाच्या केंद्रावर ५० रुपये दर असून गोवा बागायदार, साप्ताहिक बाजारात कांद्याचा दर कमी आहे.

ऐन चतुर्थी सणावेळी बाजारात कांद्याचा भाव ३० रुपये किलो. असा होता. मात्र चतुर्थीनंतर कांद्याचा भाव हळूहळू वाढत गेला. कालपर्यंत (सोमवारी) चांगल्या प्रतीचा कांदा ८० रुपये किलो होता. मात्र आता त्यात दहा रुपयांनी घसरण होताना कांद्याचा भाव ७० रुपये किलो असा झाला आहे.

कांद्याचा भाव आणखी उतरणार. असा अंदाज आहे. तसे संकेतही काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

मिळाला किमान दिलासा

गोवा फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर ५० रुपये प्रती किलो दराने कांद्याची विक्री केली जात आहे. बाजारपेठांमध्ये जरी कांद्याचे दर जरी ८० रुपये किलोपर्यंत पोहचले असताना देखील फलोत्पादन महामंडळाच्या दुकांनात ७० रुपयांनी किलो कांदे विकला जात होता.

तर मागील काही दिवसांपासून ५६ रुपये किलो दराने कांदा विक्री होत होती. आजपासून ५० रुपये किलो प्रती किलो दराने कांदा विक्री केला जात आहे.

Onion
Goa News: सत्तरीतील नानोडा-बांबर येथे सापडला मध्ययुगीन तांब्याच्या नाण्यांचा खजिना

दर पूर्वपदावर येणार

गेल्या आठवड्याच्या तुलनेने बेळगाव बाजारात कांद्याची आवक वाढली असून दरही उतरण्यास सुरवात झाली आहे. बेळगाव मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचा दर उतरला आहे. शनिवारी मार्केट यार्डमध्ये तीन हजार ते ४५०० हजार दराने कांद्याची विक्री झाली.

त्यामुळे बेळगाव बाजारात कांदा ३५ ते ५० रुपये दराने उपलब्ध होता. बुधवार ८ रोजी कांद्याची आवक वाढणार असल्याने कांद्या आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. हिरवी मिरची, वांगी, सिमला मिरचीच्या भावात १० ते २० टक्के घट झाली.

गोव्याच्या शेजारील कर्नाटक,महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या कांद्याला अन्य राज्यांना मागणी असल्याने कांद्याचा भाव वाढला होता. यावर्षी उत्पादन झालेला नवीन कांदा आता बाजारात आला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात आणखी दरवाढ झाली नाही. हळूहळू कांद्याचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

- रमेश रेड्डी, भाजी विक्रेता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com