Goa News: सत्तरीतील नानोडा-बांबर येथे सापडला मध्ययुगीन तांब्याच्या नाण्यांचा खजिना

Goa News: सत्तरी तालुक्यात नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा-बांबर येथे मध्ययुगीन तांब्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

विश्‍‍वनाथ नेने

Goa News: सत्तरी तालुक्यात नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा-बांबर येथे मध्ययुगीन तांब्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे. विष्णू जोशी यांच्या खासगी मालमत्तेत ‘हड्डीचे भरड’ या डोंगर भागात ही नाणी सापडली आहेत.

Goa News
54th IFFI Goa: ‘भाईजान’च्या उपस्थितीत होणार ‘इफ्फी’चे उद््घाटन

विष्णू जोशी व त्यांचे कामगार काजूच्या बागेची साफसफाई करताना जमिनीत मातीचा एक हंडा सापडला. त्‍यात तांब्याची नाणी होती. ही नाणी घरी आणून मोजली असता 826 इतकी भरली. त्‍यातील 10 नाणी स्वच्छ केली असता त्‍यावर विविध चिन्हे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Goa News
Kautilya Lekhabhavan: पर्वरीत साकारलंय ‘कौटिल्य लेखाभवन’; जपणार राजवटींचा वारसा

याबाबत विष्णू जोशी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, ही नाणी सुमारे 400-500वर्षांपूर्वीची असू शकतात. पूर्वीच्या काळी लोक परकीय आक्रमणकर्त्यांच्या भीतीने धन अशा प्रकारे लपवून ठेवत असत. मला ही आमच्या डोंगरमाथ्यावरील जागेत सापडली. त्‍यामुळे खूप आश्चर्य वाटले. ही नाणी मी सरकारकडे सोपविणार आहे.

या नाण्‍यांचा पुरातत्त्व खात्यातर्फे अभ्‍यास करू. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले जातील.

- सुभाष फळदेसाई, पुरातत्त्व खात्याचे मंत्री

ही नाणी 500 वर्षांपूर्वीची मध्ययुगीन असू शकतात. सत्तरीच्या मध्ययुगीन कालखंडाला कलाटणी देणारी आणि म्हादईच्‍या खोऱ्याचा समृद्ध इतिहास दर्शवणारी ही नाणी आहेत

- प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com