Viral Video: ऐकावं ते नवलंच! अटल सेतूवर अडकलेल्या युवकाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओ गोव्यात बनला चर्चेचा विषय
video viral
video viralDainik Gomantak
Published on
Updated on

आज सकाळी नेहमीप्रमाणे मेरशी परिसरात नागरिकांची कामासाठी लगबग सुरु असताना एक व्यक्ती मेरशी येथील अटल सेतूच्या खांबावर चढल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. काही वेळाने या व्यक्तीने खाली उतरण्यासाठीची धडपड सुरु केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

( One unknown person Climbed Atal Setu Goa bridge video viral )

video viral
Goa Crime : कुडचडेत युवकाकडे सापडला 38 हजारांचा गांजा

मिळालेल्या माहितीनुसार, आज मेरशी येथील अटल सेतूवर एक व्यक्ती चढल्याचं परिसरातील नागरिकांच्या लक्षात आलं. काही वेळाने या व्यक्तीने खाली उतरण्यासाठीची धडपड सुरु केली, आणि नागरिकात घबराट उडाली. थोड्याच वेळात या व्यक्तीला क्रेनच्या सहाय्याने सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले आहे. या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तसेच त्याने असे कृत्य करण्यामागचा नेमका हेतू काय? हे देखील समजू शकलेले नाही.

video viral
Sudin Dhavalikar : वन, कृषी क्षेत्रातही भू-वीजवाहिन्‍या अत्‍यंत आवश्‍‍यक

दाबोळीतील उड्डाणपुलावर महिला चढल्याने उडाली होती खळबळ

दरम्यान अशाच प्रकारे 13 सप्टेंबर रोजी स्नेहा नाईक ही महिला दाबोळी येथे ग्रेड सेपरेटरच्या खांबावर चढल्याची घटना घडली होती. ही महिला दाबोळी विमान उड्डाणपुलाजवळील ग्रेड सेपरेटरच्या खांबावर असल्याची काही टॅक्सीचालकांच्या नजरेत आली होती. त्यांनी लगेच याची माहिती वास्को पोलिसांना दिली.

अन् थोड्या वेळात शिडी लावत खांबावर बसलेल्या महिलेला खाली उतरण्यात आले. नाईक खाली उतरवल्यानंतर तिच्याकडे चौकशी केली असता काम मिळेल असे सांगून काही व्यक्तींनी तिला तिथे आणून सोडले होते. ती कारवार येथील असून तिला अज्ञाताने आणून सोडले होते. मात्र संपूर्ण गोव्यात हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com