Sudin Dhavalikar : वन, कृषी क्षेत्रातही भू-वीजवाहिन्‍या अत्‍यंत आवश्‍‍यक

डिचोलीत ‘सरकार आपल्या दारी’; सरपंच, पंचसदस्यांशी साधला संवाद
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak

डिचोली : राज्यातील प्रत्येक मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्‍यांचे जाळे विणून वीजपुरवठ्यात सुसूत्रता आणणे हे सरकारचे ध्येय आहे. मात्र ही योजना राबवितानाच आपत्कालीन संकटापासून सुरक्षा मिळण्यासाठी वन आणि कृषी क्षेत्रातही ती अंमलात आणणे गरजेचे आहे, असे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी खर्चाच्या योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा करून ‘हरित वीज’ हा केंद्र सरकारचा संकल्प तडीस नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.

‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज गुरुवारी डिचोली तालुक्यातील सरपंच व पंचसदस्यांशी संवाद साधला. ‘सेकंड इनिंग्ज’ संभागृहात आयोजित या कार्यक्रमाला डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंता मुद्रास, गटविकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर, ‘गेडा’चे संचालक डिकॉस्‍टा आणि जोगळेकर उपस्थित होते.

Sudin Dhavalikar
Francisco Sardinha : नगराध्यक्ष निवडीसाठी वटहुकूम काढणे ही सरकारची नामुष्की

अडचणी, समस्‍या घेतल्या जाणून :

मेणकुरेचे सरपंच गुरुदास परब, लाटंबार्से सरपंच पद्माकर मळीक, शिरगाव सरपंच करिश्मा गावकर, पिळगाव सरपंच मोहिनी जल्मी, कारापूर-सर्वण सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, चोडण सरपंच पंढरी वेर्णेकर, वेळगे सरपंच सामंता कामत, सुर्ल सरपंच विश्रांती सुर्लकर, पंच उमाकांत परब गावकर, मधुकर हळर्णकर, गजानन पालकर, प्रेमानंद म्‍हांबरे, विजय पोळे, तुळशीदास चोडणकर आदींनी आपापल्या भागातील वीजसमस्या आणि अडचणी मांडल्या. वीजमंत्री ढवळीकर आणि मुख्य अभियंता फर्नांडिस यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍‍वासन दिले.

डिचोली पालिकेलाही दिली भेट

  • संवाद कार्यक्रमानंतर वीजमंत्री ढवळीकर यांनी डिचोली पालिकेला भेट दिली. पालिका मंडळाचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष सुखदा तेली आणि नगरसेवक उपस्थित होते.

  • सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयात वीज खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन वीजपुरवठ्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहन कासकर उपस्थित होते. नंतर वीजमंत्र्यांनी सिकेरी-मये येथील गोशाळेलाव साखळी वीजउपकेंद्राला भेट दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com