रेल्वे प्रवासातील लूटी प्रकरणी एकाला अटक

साडेपाच लाखांचा ऐवज केला जप्त; रेल्वे पोलिसांनी वास्को येथील सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद
रेल्वे प्रवासातील लूटी प्रकरणी एकाला अटक
Published on
Updated on

फातोर्डा : रेल्वेमधून प्रवास करीत असताना एका महिलेचे सुवर्ण अलंकार मिळून रोख रुपये मिळून एकंदरीत 5.20 लाख ऐवज असलेले बेग लंपास करण्यात असल्याची तक्रर कोकण रेल्वे पोलीस स्थानकात नोंद झाली होती. या प्रकरणी कोंकण रेल्वे पोलिसांनी वास्को येथिल सराईत गुन्हेगार अस्लम कालगर याला अटक करून त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केल्याची माहिती कोंकण रेल्वे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली.

रेल्वे प्रवासातील लूटी प्रकरणी एकाला अटक
शंकरवाडी येथील मोबाईल टॉवरचा वाद पेटला; सरपंचांवर प्रश्‍नांचा भडिमार

तक्रारदार महिला कोम्बतूर एक्सप्रेसमधून प्रवास करीत होती. पहाटेच्या वेळी 3.30 वाजण्याच्या सुमारास सोन्याच्या रिंग, सोनसाखळी, रोख रक्कम या सह इतर मौल्यवान वस्तू असलेली बॅग चोरीला गेली असल्याची तक्रार केली होती. याची माहिती पोलीस तक्रारीत नमुद केली आहे. या वस्तूंची किंमत सुमारे 5.20 लाख रुपये इतकी असून अज्ञाताने या वस्तूंची चोरी केली असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

रेल्वे प्रवासातील लूटी प्रकरणी एकाला अटक
रेल्वे प्रवासात महिलेची लूट; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

तक्रारदार महिला आपल्या कुटुंबासमवेत अहमदाबाद ते कन्नूर या ठिकाणी प्रवास करीत होती. या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी भा. द. स. 356, 379 कलमानुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर तपास करत होते. या गुन्ह्याचा छडा आता लागला असुन संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com