Verna News : पहिल्या अत्याधुनिक पोलिस नियंत्रण केबिनचे उद्‌घाटन

‘वेर्णा’ प्रवेशद्वाराला मिळणार गतवैभव
Traffic Police Control Cabin
Traffic Police Control Cabin Dainik Gomantak
Published on
Updated on

वेर्णा औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक अशा राज्यातील पहिल्‍या पोलिस नियंत्रण केबिनचे उद्‌घाटन शुक्रवारी करण्यात आले. हे केबिन बिर्ला क्रॉस सिग्नल जंक्शनच्या बाजूला स्थित करण्यात आले आहे.

उद्‌घाटन सोहळ्‍याला वाहतूक पोलिस प्रमुख बॉस्युत दा सिल्वा व वेर्णा औद्योगिक संघटनेचे संस्थापक नितीन कुंकळयेकर यांची उपस्थिती होती. हे केबिन सौरऊर्जायुक्त असून त्यात लहान कचेरी, दोन बंकर बेड्स व बायोडायजेस्टर शौचालयाची व्यवस्था आहे.

Traffic Police Control Cabin
Sankhali Municipality Election 2023: साखळीत मद्यविक्रीवर निर्बंध; बार, पब, दारू दुकाने 'या' वेळेपर्यंतच सुरू ठेवता येणार

वेर्णा औद्योगिक असोसिएशनने हे केबिन सीएसआर योजनेअंतर्गत तयार केले आहे. त्‍यासाठी मेसर्स राजेश रोडलाईन्सचे सहकार्य लाभले आहे.

‘वेर्णा’ प्रवेशद्वाराला मिळणार गतवैभव

या केबिनमुळे वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराला जुने वैभव प्राप्त होणार आहे. उद्‌घाटन कार्यक्रमाला जीआयडीसीचे अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. त्‍यांनाही फायदा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com