Paroda Hill Fire: गोव्यातील जंगलात सुरू असलेल्या आगीच्या घटनांनी राज्याला घेरले आहे. काही दिवसांपूर्वी पारोडा टेकडीला आग लागली होती. नंतर ही आग आटोक्यातही आली होती. मात्र काल (5 मे शुक्रवारी) रात्री उशिरा पारोडा टेकडीवर पुन्हा एकदा जंगलाला आग लागल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीमुळे वन अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान अधिकच सतर्क होते.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसराची दुर्गमता, टेकडीचा भूभाग आणि अंधार लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीने अग्निशमन कार्य करणे कठीण झाले. पण तरीही आगीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पारोडा टेकडीवरील जंगलातील आग काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा लागली तेव्हापासून अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले होते. तेव्हाही आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर काही तासांनी पुन्हा आग लागली होती.
गेल्या गुरुवारपासून दक्षिण गोव्यात जंगलात आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत. अग्निशमन दलाची सोय नसल्यामुळे आग विझवणे कठीण झाले आहे. चिंचणी, चापोली या टेकड्यांना सुद्धा आग लागली होती.
दरम्यान, काल ढवळीतील एका भंगारअड्ड्याला भीषण आग लागली होती. या आगीत लाखो रुपयांची स्क्रॅप मालमत्ता भस्मसात झाली. ही आग इतकी भयंकर होती की, विझवण्यासाठी संपूर्ण राज्यातील अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.