ढवळी येथील भंगारअड्ड्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांची स्क्रॅप मालमत्ता भस्मसात झाली. ही आग इतकी भयंकर होती की, विझवण्यासाठी संपूर्ण राज्यातील अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्याची वेळ आली.
शुक्रवारी अचानक लागलेल्या या आगीत फोंडा ते मडगाव महामार्गावरील ढवळी येथील मुख्य रस्त्यालगतचा भंगारअड्डा खाक झाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. दुपारी दीडच्या सुमारास ही आग भडकली. प्रचंड धुराचे लोट परिसरात पसरले. त्यामुळे रस्ताही धुराने वेढला.
15 दिवसांत भंगारअड्डे हलविणार
आग लागल्यानंतर वीजमंत्री ढवळीकर यांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधून शक्य तेवढे पाण्याचे बंब घटनास्थळी पाठवण्याची सूचना केली. त्यानुसार राज्यातील पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शिवाय काही खासगी टँकरद्वारेही पाणी मारण्यात आले. येत्या 15 दिवसांत हे अड्डे हटवण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली.
शेणवी गॅरेजमधून 28 पाण्याचे टँकर्स
जगदीश शेणवी यांच्या गॅरेजमधून अग्निशामक दल तसेच इतर मिळून पाण्याचे 28 टँकर्स भरून आग विझवण्यासाठी वापरले. शेणवी यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदतच झाली. एकूण 50 पेक्षा जास्त पाण्याच्या टँकर्सचा वापर आग विझवण्यासाठी करण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.