Flower Rate Rises: गोव्यात चतुर्थीनिमित्त फुलांना मागणी वाढली, दरही चढे

उलाढाल वाढल्याने विक्रेत्यांत समाधान शेवंती,जास्वंदी,लाल गुलाबाला भाव
Flower Rate Rises in goa
Flower Rate Rises in goaDainik Gomantak
Published on
Updated on

Flower Rate Rises in Goa: राज्यात चतुर्थीनिमित्त मिठाई, फळे, फुले तसेच इतर पूजा साहित्य खरेदीत वाढ झाली आहे. राज्यात नित्यपूजेसाठी लागणाऱ्या फूलांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चतुर्थीपासून फुलांना मोठ्याप्रमाणात मागणी आहे.

शेवंती, झेंडू, जाई, जास्वंदी, दूर्वा, तसेच इतर सजावटीची फुले मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. फुलांना मागणी वाढल्याने दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Flower Rate Rises in goa
Ganesh Festival Tradition: चाररस्ता-काणकोण येथील भगतांचा नवधान्य उत्सव; ४५ कुटुंबांचा सहभाग

यंदा चतुर्थीत फुलांना बऱ्यापैकी मागणी असल्याने विक्रेते समाधान व्यक्त करत आहेत.रज्यात कर्नाटकातील बेळगाव येथून प्रामुख्याने फुले येत असतात. या काळात झेंडूच्या, जास्वंदी तसेच लाल गुलाब आणि शेवंतीच्या फुलांच्या मागणीत अधिक वाढ झाल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले.

पणजी बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होत असून मार्केटमध्ये देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. चतुर्थीनिमित्त फाती खरेदीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पुष्पहारांनाही वाढती मागणी

चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनासाठी नातेवाईकांच्या घरी जाताना, तसेच घरच्या गणपतीला तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा बाप्पाला वाहण्यासाठी आकर्षक हारांची खरेदी करण्याकडे अधिक कल असतो.

काही जण दरदिवशी वेगवेगळ्या फुलांचे, विविध प्रकारचे हार बाप्पाला अर्पण करत असतात त्यामुळे फुल विक्रेते ग्राहकांच्या मागणीप्रमाणे, विविध फुलांचे, ग्राहकांच्या मागणीनुसार विविध आकारातील हार बाप्पाला वाहतात सर्वसाधारणपणे ६० ते १५० रूपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असतात मात्र आता १५० पासून ५०० व त्याहून अधिक दरातील हार उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com